इतर

पारनेर तालुका शिवसेनाप्रमुख पदी डॉ. श्रीकांत पठारे यांची निवड

शिवसेना संपणार नाही- विजयराव औटी


दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांची शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने पारनेर तालुका शिवसेना प्रमुखपदी नियुक्ती झाली असून त्यांचे सत्कार प्रसंगी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी बोलत होते

यावेळी बोलताना विजय औटी म्हणाले तुमच्या मनातील नाव पक्षप्रमुखांच्या आदेशाने पक्षाने जाहीर केले आहे पंधरा वर्षांपूर्वीचा काळ, माझ्या आमदारकीच्या अगोदरचा आठवा पंधरा वर्षे तुम्ही सुखात असल्याने दुःख काय असते हे माहीत नाही. सत्ता कुणाच्या हातात आल्यावर जनतेला न्याय मिळेल हे आपणाला कळायला लागले आहे. लोक चाणाक्ष आहेत कोणी बोलत नाही लोकांना योग्य वेळी काय करायचे ते करतील. शिवसेना पहिल्यांदा फुटली नाही अशा घटना झाल्या आहेत परंतु शिवसेना संपली नाही संपणार नाही ठाकरे यांनी महाराष्ट्र हलवला ते आज अडचणीत आल्यावर आपण त्यांना

असे मी करणार नाही. तुम्ही कार्यकर्ते सांगता दाते सरांनी अडीच वर्ष खूप चांगले काम केले. तालुक्याचा विकासाचा दृष्टिकोन ठेवून विकास केला. परंतु सरांना संधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिली हे विसरता येणार नाही. नेता कोण असतो, ज्याला जनतेच्या नाडीवर बोट ठेवता येते, तो नेता होतो. स्तुती करणारे भरपूर असतात ज्यांना काहीतरी मिळवायचे आहे ते करतात. राजकारणात विश्वास मिळवणे सुद्धा खूप गरजेचे असते सारखे खोटे करून, ऐश्वर्य मिळवण्याचा भास होतो. परंतु राजकारण हे नदीच्या पाण्याच्या प्रवाहासारखे असते अखंड वाहत असते. असो डॉ. श्रीकांत पठारे सोज्वळ, निष्कलंक चेहरा आहे तालुक्यामध्ये शिवसेना वाढवण्याचे काम ते नक्की करणार, प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा उघडण्याचे काम त्यांच्या हातून होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि त्यांच्या भावी वाटचालीस व त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारीला शुभेच्छा देतो. सत्कार समारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व डॉक्टर पठारे यांची निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुका महिला शिवसेना आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे, पारनेर नगरपंचायत सर्व नगरसेवक यांच्यासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची व शिवसैनिकांची उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button