देशातील आदिवासी नेत्यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांची भेट!

दिल्ली-आदिवासी विकास परिषदेचे नाव ऐकताच मी भेटण्यासाठी लगेच होकार दिला मी देखील परिषदेचे संस्थापक कर्तिकजी उराव यांच्या सोबत काम केलें असून बाबा कर्तिकजी उराव यांचे योगदान खुप मोठे आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद म्हणजे आदिवासींचा आवाज असून त्यांच्या हक्कासाठी लढणारी एकमेव आदिवासी संघटना असून तिला मी जवळून ओळखत आहे माझ्या आयुष्याची सुरवात परिषदेपासूनच सुरु झालीअसे मत भेटायला गेलेल्या परिषदेच्या शिष्टमंडळासमोर महामिहिम राष्ट्रपतींनी व्यक्त केले.
यावेळी आदिवासींच्या विकासासाठी आणि वाढणाऱ्या बोगसांच्या समस्यांवर राष्ट्रपतींशी चर्चा करण्यात आली.

यावेळी राष्ट्रपतींसोबत परिषदेचे शिष्टमंडळ ,राष्ट्रिय अध्यक्ष मा.सोमजीभाई दामोर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.मधुकररावजी पिचड, महाराष्ट्र अध्यक्ष मा. रामसाहेब चव्हाण, यांचे सह राष्ट्रीय युवा अध्यक्ष मा. जितेंद्रभाऊ मोघे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष लकिभाऊ जाधव आणि अन्य राष्ट्रीय व सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष उपस्थीत होते. देशातील आदिवासी समाजाचे विविध प्रश्नावर या शिष्टमंडळाने चर्चा केली
