इतर

अकोल्यात बायफचा वर्धापन दिन उत्साहात साजरा….

बायफ संस्थेने गोरगरीब जनतेला स्वाभिमानाचे जीवन दिले पद्मश्री राहीबाई पोपेरे

अकोले /प्रतिनिधी

बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेचा 56 वा वर्धापन दिन तालुक्यातील जहागीरदार वाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे, गावच्या सरपंच वैशाली खाडे , वनपुरुष तुकाराम भोरू गबाले, ज्येष्ठ पर्यावरणवादी रमाकांत डेरे , बायफचे विभागीय अधिकारी जितिन साठे , रोटरी क्लब अकोल्याचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र डावरे , सुरेंद्र वावळे , सचिन देशमुख , सचिव सुनील नवले , खजिनदार रोहिदास जाधव , वनाधिकारी भास्कर मुठे , रीड संस्थेचे अध्यक्ष विवेक दतिर , कळसुबाई माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जाधव सर , प्राध्यापक कानवडे सर हे मान्यवर उपस्थित होते .


आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी बायफ संस्थेने गोरगरीब जनतेला स्वाभिमानाचे जीवन दिले असल्याचे गौरव उदगार काढले . हजारो गोरगरीब जनतेचा बायफ संस्था आधार आहे. संस्थेच्या माध्यमाने हजारो गरीब स्त्रिया स्वाभिमानाचे जीवन जगत आहेत हे बायफने आजपर्यंत केलेल्या कार्याचे फळ असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविकपर भाषणात बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी बायफची सुरुवात उरळीकांचन येथून कशी झाली व बायफ करत असलेल्या जन , जल , जंगल , जमीन , पशुधन या विषयातील कार्याचा आढावा सर्वांसमोर मांडला. वनपुरुष तुकाराम गभाले यांनी बायफ संस्थेने आदिवासी भागात केलेल्या कार्याचा उल्लेख करत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम व वाडी म्हणजेच फळबाग लागवडीचा कार्यक्रम सर्वप्रथम तालुक्यात याच संस्थेने राबवल्याची आठवण करून दिली . बायफ संस्थेचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर मनीभाई देसाई यांच्याशी जवळून संबंध आला त्यांनी माझ्या शेतावर येऊन माझ्या कामाचे कौतुक केल्याची आठवण त्यांनी सर्वांना सांगितली. ज्येष्ठ पर्यावरणवादी रमाकांत डेरे यांनी बायफ संस्थेचे संस्थापक स्वर्गीय मनीभाई देसाई यांच्याशी संगमनेर येथे 1985 साली जवळून संबंध आला . बायफ संस्थेच्या अतिउच्च योगदानामुळेच देशांमध्ये धवल क्रांती झाल्याचे त्यांनी नमूद केले .स्वर्गीय डॉक्टर मनीभाई देसाई यांना रा.वी पाटणकर यांनीच सर्वप्रथम अकोले तालुक्यात आणले याची आठवणही त्यांनी सर्वांना करून दिली.पर्यावरण पूरक कामे जनतेला सोबत घेत संस्थेने देशपातळीवर केल्याची माहिती त्यांनी उपस्थिताना करून दिली.

रीड संस्थेचे अध्यक्ष विवेक दातीर ल यांनी संस्थेने स्थायी रोजगारासाठी निर्माण केलेली साधने अत्यंत उपयुक्त असून देश पातळीवर संस्था करत असलेल्या कार्याचा गौरव केला. बायफ संस्थेने फेलोशिप म्हणून दिलेली संधी मला जीवनात उभे करून गेली त्यामुळेच मी समाजाची सेवा करू शकतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र डावरे यांनी आदिवासी भागातील प्रश्न सोडवण्यासाठी रोटरी क्लब अकोले बायफ सोबत निश्चित काम करील . शेतीमालाचे विक्री व्यवस्थापन करण्यासाठी रोटरी क्लब अकोले येथील आदिवासी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आदर्श शेतकरी काशिनाथ खोले यांनी बायफच्या माध्यमाने सुरू असलेल्या कामांचा गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे आयोजन गावरान बीज बँकेचे व्यवस्थापक बाळू घोडे व विमलताई घोडे यांच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्पाचे समन्वयक विष्णू चौखंडे , शुभम नवले , सुनील बिन्नर , गोरख देशमुख, किरण आव्हाड , मच्छिंद्र मुंडे , केशव घोडे, हिरामण खाडे , पांडुरंग खाडे , साहेबराव खाडे , आनंदा घोलवड , रामकृष्ण भांगरे गावातील बचत गटाच्या महिला यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कोतवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन गोरख देशमुख यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button