आधार कार्ड क्रमांक हा आपल्या मतदार ओळखपत्राशी जोडून घ्या – तहसीलदार थेटे

अकोले प्रतिनिधी
अकोले विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी आपला आधार क्रमांक आपल्या मतदार ओळ्ख पत्राशी जोडून घ्यावा असे आवाहन तहसीलदार सतीश थेटे यांनी केले आहे
216- अकोले विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनींना विनंती आहे की खाली दिलेल्या लिंक वर कृपया क्लिक करून मा. भारत निवडणूक आयोगाच्या वोटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन आपला आधार कार्ड क्रमांक हा आपल्या मतदार ओळखपत्राशी जोडून घ्यावा. विशेषतः महाविद्यालयीन तरुण-तरुणी, समाजसेवक, सामाजिक संस्था या सर्वांना विनंती की आपले नातलग, मित्र या सर्वांना नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही त्यांना नोंदणी साठी मदत करावी. असे आवाहन तहसीलदार सतीश थेटे यांनी केले आहे https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
.