गणेशोत्सवा च्या पार्श्वभूमीवर राजूर पोलीस स्टेशन वतीने रूट मार्च

राजूर /प्रतिनिधी
राजूर पोलिस स्टेशन हद्दीत आगामी गणपती उत्सव अनुशंगाने राजूर गावात रूट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्च दरम्यान 1अधिकारी,14 पोलीस अंमलदार, 07 होमगार्ड उपस्थित होते,कायदा व सुवस्थे बाबत पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी म्हणूनतसेच आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव तसेच ग्रामपंचायत निवडणूक 2022 होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी पोलीस सज्ज असावे याकरता माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजुर पोलीस स्टेशन मध्ये रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते राजुर पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असल्याबाबत नागरिकांना कळविण्यात बाबत त्यामुळे रूटमार्ट चे आयोजन करण्यात आले होते व नागरिकांना आम्ही पण आव्हान करतो की तसेच ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक कोणी कायद्याचे उल्लंघन करू नये जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल व पोलीस दलाला सहकार्य करावे असे आव्हान राजुर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी केले
