इतर

रत्नागिरी जिल्ह्यात कमवा शिका योजनेतून प्रशासकीय कामाची संधी

रत्नांगिरी प्रतिनिधी

सन २०२२-२३ या वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये, तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान- कौशल्ये आत्मसात करून देणे साठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांच्या BBA (Service Management) या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून २०% मागासवर्गीय निधी अंतर्गत विद्यावेतन देणेची नाविन्यपूर्ण योजना राबविली जाणार आहे.

सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्याना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु. ८,०००/- दुसर्‍या वर्षी रु. ९,०००/- आणि शेवटच्या वर्षासाठी रु. १०,०००/- इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल.  

सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसर्‍या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए म्हणजेच Bachler in Business Administration (Service Management) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे कार्यालयाकडून प्रमाणपत्र असा विद्यार्थ्याचा दुहेरी फायदा होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १८ ते २५ वयोगटातील बारावी पास असलेल्या / यंदा १२ वी ची परीक्षा दिलेल्या आणि उत्तम निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या गुणवंत व होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. इंदुराणी जाखड , प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे मार्फत करण्यात येत आहे.

सदर योजनेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना स्वारस्य अर्ज करण्याची अंतिम मुदत ही  २२ जून २०२२ अशी असून त्यासाठी https://tinyurl.com/zpratibba2022 ही ऑनलाईन लिंक समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद रत्नागिरी चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा डॉ इंदुराणी जाखड यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button