इतर

जवळ्याच्या ग्रामपंचायत विरोधात निषेध मोर्चा ….


मनमानी व भ्रष्ट कारभारा विरोधात
ग्रामस्त आक्रमक

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील जवळे ग्रामपंचायतीच्या विरोधात संतप्त नागरिकांनी निषेध मोर्चा काढला . गेल्या काही दिवसांपासून जवळे पंचायतीच्या मनमानी व भ्रष्ट कारभारा बाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. ग्रामपंचायतीच्या किरकोळ खर्चाची अव्वाच्या सव्वा बिले काढणे . विकास कामांच्या बदल्यात पदाधिकाऱ्यांकडून कमिशनची मागणी करणे , महिला सरपंच व सदस्यांच्या पतींनी पंचायत कारभार हस्तक्षेप करणे , कोणतीही वसुली न करणे, गावातील अतिक्रमण धारक व अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालने , ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी ठराव मंजूर करणे , ग्रामसभांना सदस्यांचीच अनुपस्थिती असने याविषयीच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांच्या होत्या .
या प्रश्नावर ग्रामसभेत वेळोवेळी आवाज उठवूनही काहीच उपयोग होत नाही , म्हणून या निषेध मोर्चाचे आयोजित करण्यात आले होते . जवळे पंचायतीच्या तिजोरीत आज खडखडाट आहे . किरकोळ कामांना देखील रक्कम शिल्लक नसल्याचे ग्रामस्थांना सांगितले जाते . त्यामुळे

जवळे ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली .पुढील काही महिन्यात ग्रामपंचायत कारभार सुरळीत न झाल्यास सरपंच व सदस्यांना माघारी बोलवण्यासाठी प्रति ग्रामसभा भरवली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला . काळे झेंडे , मटका , ताडी , जुगार पत्या , दारुच्या रिकाम्या बाटल्या यांचा आहेर यावेळी पंचायतीला अर्पन करण्यात आला .
मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी कुणीही पदाधिकारी हजर नसल्याने निवेदन सरपंच यांच्या खुर्चीला चिटकवण्यात आले .
या मोर्चाचे आयोजन संतोष सालके ,भाऊसाहेब आढाव यांनी केले .
तर या मोर्चावेळी बबनराव सालके रामदास घावटे , गोरख सालके , ज्ञानदेव पठारे ,ओंकार सालके , संजय कोठावळे , .शांताराम बरशिले , सतीश रासकर , कैलास आढाव ,भाऊसाहेब दरेकर बाळासाहेब सालके यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button