बाजार बुणगे म्हणतात सावंतांनी काहीतरी घेतले, सावंत बरळले….. तर माझे प्रेत दिसेल

अगस्तीचे राजकारण तापले
अकोले, ता.१२: जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या शब्दाला मान देऊन माघार घेतली होती
.मात्र अगस्ती कारखाना निवडणुकीत सीताराम गायकर याना नेतृत्व व उमेदवारी देऊ नये या अटीवर माघार झाली मात्र गायकर यांची पिलावळ लुंगेसुंगे बाजार बुणगे म्हणतात सावंत यांनी माघार घेण्यासाठी काही तरी घेतले. येत्या १५ तारखेला अजित दादा येणार आहेत त्यांना जाब विचारण्यासाठी मी स्टेजवर जाणार आहे. मला स्टेजवर जाऊ दिले नाही तर तालुक्याला माझे प्रेत दिसेल असे उद्गार शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषदेत काढले.
यावेळी निवृत्त प्रशासकीय अधिकारी बी. जे.देशमुख,बाजीराव दराडे,सोमनाथ थोरात,रवी मालुंजकर, भाऊसाहेब नवले, राक्षे उपस्थित होते.प्रसंगी बोलताना सावंत म्हणले जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना नोकर भरतीत घोटाळा करून तोच पैसा आज अगस्ती निवडणुकीत वापरला जात आहे. गेली दोन वर्षापासून आम्ही अगस्ती कारखान्यात चालू असलेला गोंधळ जनतेसमोर सभासदसमोर मांडत आहोत. त्यासाठी अगस्ती निवडणुकीत परिवर्तन पॅनल उभा केला.मात्र तिरंगी लढत झाली तर गायकरांची टोळी निवडणुकीत यशस्वी होऊन चुकीच्या लोकांच्या ताब्यात कारखाना जाईल असे लक्षात आले त्यात माजी मंत्री पिचड यांचा जिल्हा बँकेत काही संबंध नाही, अगस्ती मध्ये गायकर यांचा सहभाग अधिक आहे.पिचड यांच्या पॅनल मध्ये चांगले तरुण उभे आहेत, याबाबत आमच्या काही सूचना होत्या त्या आम्ही माजी मंत्री पिचड यांच्यासमोर मांडल्या त्यांचा सकारात्मक होकार आल्यावर आम्ही निर्णय घेऊन परिवर्तन पॅनल ला पाठिंबा दिला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्री अजितदादा यांचा मला फोन आल्यानंतर आम्ही आमदार लहामटे, बी.जे.देशमुख, विनय सावंत, अशोक भांगरे यांच्या समवेत दादांना भेटायला गेलो त्यावेळी मी माझी भूमिका मांडताना सीताराम गायकर याना कारखाना निवडणुकीत नेतृत्व अथवा उमेदवारी देऊ नका मी तुमचा मान राखून माघार घेतो त्यावर दादा यांनी कारखाना निवडणुकीत एकत्र बसून उमेदवारी बाबत निर्णय घेऊ. मात्र नंतर निवडणूक लागल्यानंतर आमचे सोबत असणारे गायकर यांनी आपल्याकडे घेतले नी त्यांच्या पिलावळी ने मला काही तरी मिळाले असा अपप्रचार केला त्यासाठी येत्या १५ तारखेला अजितदादा,बाळासाहेब थोरात येत असून त्यांना मी जाब विचारण्यासाठी त्यांच्या स्टेजवर जाणार आहे. मला स्टेजवर येऊ दिले नाही तर माझा मृतदेह तालुक्याला दिसेल असा इशारा सावंत यांनी दिला आहे. त्यामुळे तालुक्याचे राजकारण तापले आहे.