आकाश कंदील बनवा ,जिंका सेमी पैठणी साड्या..

.
सोलापुरात महिलां साठी राज्यस्तरीय स्पर्धा
‘
सोलापूर दि११
दिवाळी म्हटले की, प्रत्येकाचे आनंद वेगळाच असतो. सर्वच नवीन वस्तू खरेदी करतात. माणसांबरोबर घरालाही सजावटीसाठी प्राधान्य देण्यात येते. दिवाळीत तर, प्रत्येक जण आकाश कंदील बाजारात खरेदी करुन, घराला सुशोभित होण्यासाठी दर्शनी भागात लावले जाते. यामुळे घराची शोभा वाढते. म्हणून, सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने राज्यस्तरीय फक्त महिला वर्गासाठी (सर्व वयोगटांसाठी) बनवा आकाश कंदील, जिंका सेमी पैठणी साड्या.. हा अनोखा उपक्रम आयोजित केल्याची माहिती सचिव राधिका आडम यांनी दिली.
सदरची स्पर्धा राज्यस्तरीय असून
सर्व वयोगटातील महिलांसाठी ही स्पर्धा आहे. दोन बाय दोन (2×2 फूट) साईजच्या प्रकारात आकाश कंदील तयार करायचे आहे. विविध रंगातील आकाश कंदील स्पर्धक स्वतः बनवतानाचे व्हिडीओचे पीडीएफ (दोन मिनिटाच्या आतील) तसेच फोटो ९१७५९८८९४० या टेलिग्राम मोबाईल क्रमांकावर पाठवायचे आहेत. त्यासाठी टेलिग्राम अँप प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा.
१) टेलिग्राम क्रमांकावर दि. २० आक्टोंबर पर्यंत योग्य पध्दतीने पोहोचतील याची काळजी घ्यावी.
२) आकाश कंदील बनवताना प्लॅस्टिक किंवा थर्माकोलचा वापर करु नयेत..अन्यथा स्पर्धेतून ‘बाद’ करण्यात येईल.
३) बाजारातून खरेदी करुन तेच पुन्हा बनवण्याचा प्रयत्न करु नयेत.
४) अंतिम निर्णय संयोजकांचा राहील. प्रथम, द्वितीय आणि तिस-या क्रमांकासाठी सोलापूरातील चाटला पैठणी सेंटरच्या वतीने बक्षीसे देण्यात येणार आहे.
बनवा आकाश कंदील, जिंका सेमी पैठणी साड्या.. या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्ष माधवी अंदे, उपाध्यक्ष संध्याराणी अन्नम, सचिव राधिका आडम, सहसचिव जमुना इंदापूरे, कार्याध्यक्ष वैशाली व्यंकटगिरी, सहकार्यध्यक्ष लक्ष्मी चिट्याल, खजिनदार प्रभावती मद्दा, सहखजिनदार ममता मुदगुंडी यांनी केल्या आहेत.