इतर
राज्या बाहेरील अनेक शनी भक्तांचे शनिअमावश्याला शनी शिंगणपुरात शनिदर्शन!

शनिशिंगणापूरात पाच लाखाहून भाविकांचे शनिदर्शन
-[ विजय खंडागळे] -
सोनई प्रतिनिधी
श्रावण महिन्याची समाप्ती, शनी अमावस्या यात्रा एकाचवेळी आल्याने शनिअमावश्या यात्रा मोठया उत्सवात पार पडली.
शनी अमावस्या,श्रावण चा शेवटचा शनिवार,व सुट्टी सलग आल्याने शनीअमावस्या यात्रा निमित्ताने पाच लाखाहून अधिक भाविकांनी आवर्जून हजेरी लावून शनिदेवाचे दर्शन घेतले.
रात्री १२ वा.पुणे येथील राहुल गोडसे,महेंद्र पारडे, पहाटे संभाजीनगर येथील माजी खा.चंद्रकांत खैरे, दिल्ली चे मेहतांनी साहेब,ऑस्ट्रेलियचे राकेश कुमार,दुपारी मुबईचे शनिभक्त सौरभ बोरा,झिम्बाब्वेचे जयेश शहा,आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपट पवार यांच्या हस्ते आरती विधिवत पूजा करण्यात आली.
सायंकाळी ओरिसाचे शनिभक्त नब किशोर दस यांच्या हस्ते आरती होऊन संकल्प केलेला सतरा लाखाचा कलश शनिदेवाला अर्पण करण्यात आला
शुक्रवारी रात्री पासून भाविकांची गर्दी वाढत शनिवारी दिवसभर गर्दी झाली होती. दिवसभर ढगाळ वातावरण, ऊन पडत होते,त्यामुळे उकडा जाणवत होता.दुपारी भाविकाची गर्दी कमी दिसत होती.शनिचौथर्याच्या काही अंतरावर भाविकांची दर्शन रांगेत विनामास्क भाविक यांनी गर्दी केली होती. या निमित्ताने प्रवेशद्वार, मंदिरपरिसर,शनिचौथर्या ठिकाणी विद्यतूत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
ठीक ठिकाणी भाविकांना दिल्ली, हरियाणा, येथील भाविक भांडर प्रसादाचे शनिभक्तांकडून वाटप करण्यात येत होते. भावीकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पार्किंग व्यवस्था घोडेगाव रोड वरील ग्रामीण रुग्णालयात, मुळा कारखानाच्या काही अंतरावर,नगर औरंगाबाद रोडवरील या ठिकाणी करण्यात आल्याने भाविकांना दुरवरून पायी चालत यावे लागत होते.खाजगी वाहतुकीची साधने मोठ्या प्रमाणात असल्याने भाविकांकडून मनमानी पैसे आकारण्यात येत होते.
दिवसभरात सुरतचे ओरिसाचे शनिभक्त नबकिशोरी दस,आ.जनक पटेल,आ.प्रफुल पनशेरीया,माजी मंत्री शंकरराव गडाख ,माजी मंत्री शिवाजी कर्डीले, आ. भाऊसाहेब कांबळे, युवा नेते उदय गडाख,यांच्यासह अनेक मान्यवरांनी विधिवत पूजा करून शनिदर्शन घेतले.
भाजपचे गुजरात हुन आलेले आ.जनक पटेल व आ.प्रफुल पनशेरीया यांचे स्वागत भाजपचे नेवासा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, नेवासा तालुका भाजप ओबीसी संघटनेचे अध्यक्ष देविदास साळुंके,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार, पाचेगावचे सरपंच दिलीप पवार,यांनी स्वागत केले.
यावेळी भाविकांना शनिप्रसाद बर्फी नेण्यासाठी नियोजन नसल्याने अक्षरशः प्रसाद स्टॉल वर भाविकांना रेलचेल करावी लागत होती. काही अंतरावरून पायी यावे लागल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.
पत्रकार विजय खंडागळे, व पोलीस पाटील सायराम बानकर यांनी घोडेगाव, सोनई,व उस्थळ दुमाला आरोग्याच्या दृष्टीने भाविकांची चौकशी करून उपचारासाठी मदत करत होते.
राज्याच्या कानाकोपऱ्यातुन यावेळी पाच लाखाहून अधिक भाविक आल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर ,विकास बानकर,पोपट शेटे,आप्पासाहेब शेटे,ऍड.सायराम बानकर, बाळासाहेब बोरुडे, आप्पा कुऱ्हाट,आदी पदाधिकारी ,कार्यकारी अधिकारी जी.के.दरदले हे व्यवस्था वर लक्ष ठेऊन होते.विशेष अतिथीचा सन्मान कार्यकारी अधिकारी जी.के.दरदले, व उपकार्यकरी अधिकारी नितीन शेटे हे करत होते.दिवसभर भाविकांचा ओघ चालू होता.यात्रा शांततेत पार पडली.
