अकोले तालुक्यातील जांभळे गावचे माजी सरपंच श्री तबाजी गवांदे यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील जांभळे गावचे माजी सरपंच श्री तबाजी सबाजी गवांदे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्यांचे वय 88 वर्ष होते. ते दादा या नावाने प्रसिद्ध होते.
ते जांभळे वि का सेवा सोसायटी चेअरमन होते, नगर पुणे जिल्ह्यात ते प्रसिद्ध गाडा मालक म्हणून परिचित होते. जांभळे गावचे सरपंच असताना अखंड हरिनाम सप्ताह, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व बैलगाडा शर्यत सुरू केली होती. गावची पाणीपुरवठा योजना, पाझर तलाव, आरोग्य केंद्र पण त्यांचे काळात झाले.सोसायटी चेअरमन पदाच्या काळात दुग्ध व्यवसाय ला चालना दिली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गवांदे सर यांचे वडील तर जी एस टि सुभाष गवांदे, ऑडिटर अनिल गवांदे, सागर गवांदे, घाटकोपर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुषार गवांदे यांचे चुलते होते.जांभळे येथे त्यांच्या वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड, भाजपा तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक फापळे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोक आवारी आदी उपस्थित होते
.——–—