अकोले भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस पदी मच्छिंद्र मंडलिक

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील माळीझाप अकोले येथिल मच्छिंद्र मंडलिक यांची भारतीय जनता पार्टीच्या अकोले तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
मंडलिक यांनी अकोले शहर अध्यक्षपद, तालुका उपाध्यक्ष, गेले तीन वर्ष तालुका सरचिटणीस. सतत अकोले शहरात, तालुक्यात भाजप पक्षाचे एकनिष्ठ काम, पक्षाची भूमिका, ध्येय धोरणे, पक्षाने दिलेली सर्व कामे केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचवणे व लक्ष देणे अनेक प्रश्न, अडचणी त्यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या व भाजपच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनासमोर मांडल्याने यामुळे जनतेच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे भरीव काम त्यांनी केले. त्यांच्या सर्व कामांची दखल घेऊन पुन्हा त्यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मा. मधुकरराव पिचड, भाजप अनुसूचित जाती जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री मा. आमदार वैभवभाऊ पिचड, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, जिल्हा सरचिटणीस सिताराम पाटील भांगरे, तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे , जालिंदर वाकचौरे, शिवाजीराजे धुमाळ, अकोले एज्युकेशनचं अध्यक्ष सुनिल दातिर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, ज्येष्ठ नेते गिरजाजीराव जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, रमेश राक्षे, दत्ता शेनकर, भाऊसाहेब वाकचौरे, ॲड दिपक शेनकर, सुदाम मंडलिक, दत्ता ताजणे, यांसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.