नाशिक रोटरी तर्फे मंगळवारी ‘कायदे मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन !

नाशिक : नागरिकांमध्ये वेगवेगळ्या कायद्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, माहिती व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ‘कायदे मंथन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत
“एमएसएमइबद्दल सर्व काही” याविषयी मंगळवार (दि. १७) रोजी संध्याकाळी ५.३० वाजता रोटरी क्लबच्या गंजमाळ येथील सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाचे सदस्य प्रदीप पेशकार हे उपस्थित राहणार आहेत. ॲड. सचिव गोरवाडकर आणि ॲड. जालिंदर ताडगे हे मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमात “एमएसएमइ कायद्याबद्दल सर्व काही”, त्याची प्रक्रिया, नोंदणी,आर्थिक फायदे, विविध परवाने, प्रशिक्षण, कार्यपद्धती, रोजगाराच्या संधी, उद्योग यशाच्या शिखरावर नेण्यासाठी काय करावे, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना तसेच उद्योग- व्यवसायाच्या दृष्टीने कोणते कायदे आहेत अशा प्रकारचे मार्गदर्शन यावेळी केले जाणार आहे. या कार्यक्रमास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडिया, उपाध्यक्ष शशिकांत पारख, सचिव ओमप्रकाश रावत, मंथ लीडर ॲड. विद्युलता तातेड आणि ॲड. राजेश्वरी बालाजीवाले आणि संचालक दमयंती बरडिया यांनी केले आहे.