राजूर पोलिसां कडून एफ्तार पार्टीचे आयोजन

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी.
राजूर शहरांमध्ये हिंदू-मुस्लीम सलोख्याचे संबंध हे वाखाणण्याजोगे असून राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्यासाठी सर्व राजूर कर नेहमीच प्रयत्नशील असतात याचा मला सार्थ अभिमान असल्याचे असे प्रतिपादन राजूर पोलिस ठाण्याचे सा.पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी आयोजित केलेले एफ्तार पार्टी वेळेस बोलत होते . मात्र दोन वर्ष कोरूना च्या संकट काळामध्ये गेल्या दोन वर्षात हा कार्यक्रम करता आला नाही मात्र कोरूना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राजूर पोलिसांनी हा कार्यक्रम करता आला राजूर पोलिसांनी मज्जीद चे आवारात मुस्लिम बांधवांसाठी एक इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते राजूर शहरातील मोहल्ला कमिटी शांतता कमिटी जामा मजीत रस मुस्लिम बांधव पोलीस कर्मचारी या पत्रकारांची उपस्थिती मध्ये एफ्तार पार्टीचे आयोजन केले होते याप्रसंगी व्यासपीठावर सा.पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे प्रशासक दिनकर बंड ग्रामविकास अधिकारी बी डी नाडेकर सामाजिक कार्यकर्ते..डॉ रसीदभाई. फारुकी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ दिघे,अकील तांबोळी हाजी रज्जाक तांबोळी समुद्दीन तांबोळी मा. सरपंच गणपत देशमुख अरुण माळवे पोलीस कॉ. अशोक गाडे पो कॉ. मुलाणी तसेच पत्रकार.इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्रीराम पन्हाळे यांनी राजूर मध्ये हिंदू-मुस्लीम नेहमी एकोप्याने राहतात तसेच भास्कर येलमामे यांनी जुने आठवणीना उजाळा करून दिला यावेळी संतोष बनसोडे मा उपसरपंच गोकुळ कानकटे पत्रकार शांताराम काळे यांनी ही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिलेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकीर मणियार तर आभार पो. कॉ विजय फटांगरे यांनी केले
