जायनावाडी येथे बैलपोळा मोठया उत्साहात साजरा.

अकोले प्रतिनिधी
पाऊस पडल्यावर काळया आईची ओटी भरली की ती भरभरून दान देते.हे गृहीतक अनेक शतकांपासून चालू आहे.त्यातच शेतकरी राजाची आणि वृषभराजाची धडपड.या दोन्ही राजांच्या धडपडीला वरूण या तिसऱ्या राजाने साथ दिली की सार्थक होते हेही तितकेच खरे आहे. मग आमचा मळा हिरवागार होतो जणू काही हिरवी शाल पांघरल्यागत. मग आमचा शेतकरी राजा आपल्या लेकराबाळांसह पेरणीची तयारी करतो.कष्ट हवे मातिला चला जपुया पशुधनाला या उक्तिप्रमाणे जगाचा पोशिंदा अन्नदाता असलेल्या बळीराजाच्या कष्टाचा प्रामाणीक वाटेकरी, सच्चा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजेच बैलपोळा अकोले तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या जायनावाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात बळीराजाची मिरवणूक काढून मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद व्यक्त केला.जायनावाडी येथील श्री भैरवनाथ मंदीर येथे मंदिराला दरवर्षाप्रमाणे पाच फेरे मारून बळीराजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर महादेवाच्या मंदिराला फेरे मारून विठ्ठल रुख्मिणी मंदीर येथे बळीराजाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांचे पुजन करण्यात आले.यावेळी गावातील शेतकरी राघू भांगरे, अशोक भांगरे,आनंदा भांगरे, देवराम भांगरे,भोरु, भांगरे नवसू भांगरे,मारुती भांगरे,कैलास भांगरे, काळू भांगरे,हरिदास भांगरे,लालू भांगरे, मुरलीधर भांगरे,धर्मा भांगरे,कैलास भांगरे,वाळू भांगरे,काळू भांगरे, खंडू भांगरे यांसह बहुसंख्य ग्रामस्थांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद व्यक्त केला.दरम्यान तालुक्यातील एकदरे तसेच अन्नमाता म्हणून ओळख असलेल्या राहीबाई पोपेरे यांच्या कोभाळणे येथील पोपेरेवाडीतही बैलपोळा मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी अन्नमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांसह बहुसंख्य शेतकऱ्यांनी बैलपोळ्याचा आनंद घेतला