अकोले तालुक्यात ३२ BSNL टॉवरची उभारणी होणार

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नांना यश
अकोले / प्रतिनिधी
अकोले तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात नेटवर्क नसल्यामुळे शासकीय काम व विद्यार्थ्यांना समस्या येत होत्या. याची गंभीर दखल घेत खासदार सदाशिव लोखंडे यांनी घेत केंद्र सरकारकडून भारत संचार निगम लिमिटेडकडून ३२ टॉवरची मंजुरी घेतली आहे. यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
आदिवासी दुर्गम भागात नेटवर्क नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेत खासदार लोखंडे यांनी मागील हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. दरम्यान, कोरोना महामारीमध्ये ऑनलाइन शिक्षण असल्याने नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. तसेच शासकीय कामकाज करतानाही अनेक समस्या उदभवत होत्या. ही गंभीर बाब लक्षात घेऊन खासदार सदाशिव लोखंडे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला.
- आदिवासी दुर्गम भागांतील मुथाळणे, पिंपळदरावाडी, जायनावाडी, कोकणवाडी, उंबरेवाडी, पळसुंदे, कळंब, बोरी, मुतखेल, उडदावणे, पांजरे, साम्रद, कोथळे, लव्हाळी ओतूर,लव्हाळी कोतूळ, वागदरी, पिंपरी, पाचनई, खडकी खुर्द, खडकी बुद्रुक, शिरपुंजे खुर्द, शिरपुंजे बुद्रुक, कुमशेत, शिसवद, आंबित, गोंदुशी, मवेशी, पुरुषवाडी, साकीरवाडी, बारववाडी, बलठण, फोपसंडी या ३२ गावांमध्ये भारत संचार निगम लिमिटेडच्या टॉवरची उभारणी होणार आहे.
यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनचा प्रश्न निकाली निघणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.