इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि. ०१/०९/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १० शके १९४४
दिनांक :- ०१/०९/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४३,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति १४:५०,
नक्षत्र :- स्वाती समाप्ति २४:१२,
योग :- ब्रह्मा समाप्ति २१:११,
करण :- कौलव समाप्ति २६:२४,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

राहूकाळ:- दुपारी ०२:०२ ते ०३:३६ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१६ ते ०७:४९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२९ ते ०२:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०२ ते ०३:३६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:०९ ते ०६:४३ पर्यंत,

दिन विशेष:-
ऋषिपंचमी, जैन संवस्तरी, घबाड २४:१२ नं., दग्ध १४:५० नं., षष्ठी श्राद्ध,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १० शके १९४४
दिनांक = ०१/०९/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
आपल्या तत्वाला थोडी मुरड घालावी लागेल. जवळचा प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. अकल्पित घटनांना धिटाईने सामोरे जा. कार्यक्षेत्रात नवीन अधिकार मिळतील. आततायीपणा करून चालणार नाही.

वृषभ
बोलण्यात खंबीरपणा ठेवावा. तुमच्याबाबत इतरांचा गैरसमज होऊ शकतो. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे मत जाणून घ्या. मित्रांची संगत तपासून पहा.

मिथुन
आवडत्या व्यक्तीची भेट होईल. काही निर्णयासाठी थांबावे लागेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यापारी वर्गाला भागिदारीतून लाभ मिळेल. जोडीदाराचे सक्रिय सहकार्य मिळेल.

कर्क
जोडीदाराच्या मताचा विचार करा. आळसात दिवस ढकलू नका. नवीन ओळखीचा लाभ होईल. भावनिक विचार करू नका. दैनंदिन कामात चिकाटी बाळगा.

सिंह
डोके शांत ठेवून काम करावे. नेटाने व्यायाम करावा. मन चंचल राहील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. माणसे ओळखायला शिकावे.

कन्या
अधिकाराचा वापर योग्य ठिकाणी करावा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आहारावर नियंत्रण ठेवावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. अन्यथा पोटाचे विकार त्रस्त करू शकतात.

तूळ
आपला दिवस आनंदात जाईल. लहान प्रवासाची शक्यता. मार्गदर्शक व्यक्तींच्या भेटीचा योग. कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याल. सर्व गोष्टींची खातरजमा करावी.

वृश्चिक
कुटुंबात अधिकार प्राप्त होईल. चांगल्या गोष्टीसाठी पैसा खर्च होईल. व्यवसाय वाढीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. महिला सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल. नवीन गोष्टी जाणून घेता येतील.

धनू
जोडीदाराच्या सद्गुणांनी आनंद मिळेल. कर्ज फेडीचे एक पाऊल पुढे टाकाल. कामाच्या ठिकाणी तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर
आपल्या माणुसकीची इतरांना कल्पना येईल. धडपडया वृत्तीवर संयम ठेवावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. आजचा दिवस चांगला जाईल.

कुंभ
मानसिक प्रसन्नता लाभेल. जुन्या मित्रमंडळींशी संवाद होईल. आपल्या वागणुकीने वाहवा मिळवाल. पालकांचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक लाभाचे योग.

मीन
घेतलेला निर्णय योग्य ठरेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. भागीदारीतील व्यवसायातून लाभ होईल. धार्मिक आवड वाढीस लागेल. तुमच्या बोलण्याचा घरातील लोकांवर प्रभाव पडेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button