इतर

पारनेर तालुक्यातील तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात!

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी दि २८

वारस नोंदी साठी तीन हजाराची लाच मागणारा पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथील तलाठी अँटी करप्शन च्या जाळ्यात अडकला या कारवाईने पारनेर तालुक्यातील महसूल विभागाची लाज खोरी चव्हाट्यावर आली आहे अहिल्या नगरच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या सापळा कारवाईत लाचखोर तलाठी अलगद अडकला

यशस्वी सापळा कारवाई
▶️ युनिट –अहिल्यानगर.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 35 वर्षे
▶️ *आलोसे – आशीर्वाद प्रभाकर घोरपडे, वय – 34 वर्ष, पद – तलाठी सजा पाडळी आळे, ता.पारनेर,
जिल्हा अहिल्यानगर रा.घर नं.155, पाईपलाईन हडको एकविरा चौक, सावेडी, अहिल्यानगर
▶️ लाचेची मागणी
3,000/- रुपये.
दिनांक -24/03/2025
▶️ *लाच स्विकारली
3,000/ रुपये
दिनांक -24/03/2025
▶️ *हस्तगत रककम
3,000/-रुपये

▶️ लाचेचे कारण
तक्रारदार हे पाडळी आळे, ता.पारनेर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांच्या आत्या ह्या शेजारच्या कळस ता.पारनेर या गावच्या मूळ रहिवासी असून त्या अशिक्षित आहेत. कळस येथे तक्रारदार यांच्या आत्याचे पती यांचे नावे शेत जमिनीचे गट क्रमांक 37 व गट क्रमांक 48 असे दोन गट आहेत. तक्रारदार यांच्या आत्याचे पती हे दिनांक 6/8/2023 रोजी मयत झाले होते. तक्रारदार यांचे आत्याच्या पतीच्या नावे असलेल्या शेत जमिनीला वारसदार आहेत. सदर शेत जमिनीला वारस नोंद लावण्यासाठी पाडळी आळीचे तलाठी यांच्याकडे सर्व संबंधित कागदपत्रे एक महिन्यापूर्वी जमा केली होती. तक्रारदार यांच्या आत्या ह्या अशिक्षित तसेच वयोवृद्ध असल्याने व तक्रारदार यांचा आते भाऊ हा पनवेल नवी मुंबई येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या कळस येथील शेत जमिनी बाबतच्या वारस नोंदीच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांच्या आत्या यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले आहे. सदर वारस नोंद लावण्याकरिता लोकसेवक घोरपडे, तलाठी सजा पाडळी आळे यांनी 5000/- रुपये लाचेची मागणी केले बाबतची तक्रार दि.24/03/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.24/03/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक आशीर्वाद प्रभाकर घोरपडे, तलाठी सजा पाडळी आळे, ता.पारनेर यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे शेत जमिनीची वारस नोंद लावण्यासाठी 3,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि.24/03/2025 रोजी पाडळी आळे, तलाठी कार्यालय, ता.पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक घोरपडे यांनी तक्रारदार यांचे कडून 3,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पारनेर पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा व तपास अधिकारी
श्रीमती छाया देवरे,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8788215086
▶️ *सापळा पर्यवेक्षण अधिकारी*
श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि., अहिल्यानगर, मो. क्र .8329701344
▶️ सापळा पथक
पोलीस नाईक चंद्रकांत काळे,
पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, चापोहेकॉ. दशरथ लाड
▶️ *मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391

▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा.जिल्हाधिकारी, अहिल्यानगर

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर.
@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677 @ टोल फ्रि क्रं. 1064

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button