इतर

जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते यांचे हस्ते .देसवडे, काळेवाडी येथे विकास कामाचे भूमिपूजन

पारनेर प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते यांचे हस्ते .देसवडे, काळेवाडी येथे विविधविकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियांका खिलारी तर उप तालुका प्रमुख सुनिता ताई मुळे, शिवसेना संघटक दीपक उंडे, माजी चेअरमन भाऊसाहेब टेकडे, ग्रा.प. सदस्य विकास रोकडे, सरपंच पोपट दरेकर, चेअरमन संतोष टेकुडे, उपसरपंच सचिन भोर प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले जिल्हा परिषद निवडणूकीत आपल्या विचाराची कार्यकर्ते निवडून द्यावे लागतील. जिल्हा परिषद मध्ये आपण जो विकासाचा पायंडा पाडला आहे तो पुढे असाच चालू ठेवावा लागणार आहे. देसवडे, काळेवाडीचा सर्व परिसर हा माझा परिसर आहे. कारण माझं बालपण, लहानपण याच परिसरामध्ये गेलेले आहे, या लोकांबरोबरचा संपर्क, जिव्हाळा मी कधीही कमी होऊ दिला नाही. मी जरी पारनेरला राहत असलो तरी हा सर्व परिसर मी माझे कुटुंब समजतो. मी गेली चाळीस वर्षे काम करतोय कारण प्रेमाची, जीवाभावाची, नातलग ही सर्व या परिसरामध्ये आहे. जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा या भागातील जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे. आज काळेवाडी पान घाटाचे काम करणे, टेकडवाडीचा घाट रस्ता करणे ही महत्त्वाची कामे आपण करणार असल्याचेही सभापती दाते सर यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी जावळदरा रस्ता करून देण्याची मागणी केली तो रस्ताही करून देण्याची आश्वासन सभापती यांनी दिले. काळेवाडीतील प्रत्येक घरात नळ योजना राबवणार आहे. आपला परिसर शेतीच्या माध्यमातून प्रगत झाला असून रस्ते दळणवळणासाठी चांगले असल्याने आपलेही जीवनमान उंचावले आहे. तुम्ही मला जिल्हा परिषद मध्ये निवडून दिल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब व माजी आमदार विजय औटी यांनी मला बांधकाम समितीमध्ये काम करण्याची संधी दिली. भविष्यात माझ्याकडून जे काही सहकार्य करता येईल ते मी अविरत करत राहील तुम्हीही साथ मला राहू द्या अशी अशा सभापती दाते यांनी व्यक्त केली. कामाचे दिवस असूनही तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलास, आपण कार्यक्रम खूप छान केला, आम्हाला बोलावले आमचा सन्मान केला सर्वांचे खूप खूप आभार मानतो. यावेळी  प्रियंका खिलारी, सुनिता मुळे, दिपक उंडे, किशोर टेकुडे सर, संपत तोडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यामध्ये जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी इमारत बांधकाम करणे – ९.५० लक्ष, जिल्हा परिषद १५ वा वित्त आयोग अंतर्गत काळेवाडी येथे पाण्याचे टाकी करणे – ६.५० लक्ष, देसवडे गावांतर्गत गटार लाईन करणे – ५ लक्ष.
चौकट : आम्ही राजकारणाचे समर्थक नाही पण विकास कामांचे नक्कीच समर्थक आहोत. विकास कामांचा पाऊस आपल्या तालुक्यात सभापती दाते सरांनी पाडला. गंगा आपल्या जवळ आहे, आळशी राहून जर यामध्ये स्नान केले नाही तर आपल्या इतके दुर्भाग्य आपणच राहू. ग्रामीण भागाचा चेहरा बदलण्याचे काम चालू आहे. आमच्या पान घाटाचा प्रश्न सरांनी सोडविला :  ह.भ.प.  शिवाजी महाराज दाते
यावेळी संतोष फटांगरे, दत्ता फटांगरे, संजय भाऊ भोर, उपसरपंच सिताराम केदार,भाऊसाहेब कारभारी टेकुडे, पांडुरंग गुंड, संपत तोडकर, धोंडीभाऊ दाते, युवा सेना शाखा प्रमुख राजेंद्र गुंड, प्रकाश टेकुडे, प्रदीप टेकुडे, जिजाभाऊ टेकुडे, बाबासाहेब वाडेकर, दीपक गुंड, सुरेश तोडकर, सकाहारी दाते, सुभाष गुंड, नवनाथ दाते, औटी सर, मेंगाळ सर, कोंडीभाऊ वाडेकर, किशोर टेकुडे, बंडू औटी, शाखाप्रमुख बाजीराव शिंदे, शितल दाते, अश्विनी गुंड, प्रतीक्षा गुंड, विमल दाते, मनीषा औटी, शिवाजी महाराज दाते, संजय नाना भोर, ज्ञानदेव पवार, युवा शाखाप्रमुख शिवम पवार ग्रामसेवक बाळासाहेब वाळुंज, राहुल पारधी, देविदास टेकुडे, राहुल फटांगरे, अमोल भोर, अमोल गुंड, साहेबराव वाडेकर, साहेबराव भोर, संकेत भोर, संतोष टेकुडे कामाचे ठेकेदार बबन वाळुंज, जयवंत वाळुंज इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी महाराज दाते, किशोर टेकुडे सर यांनी केले सूत्रसंचालन पांडुरंग गुंड यांनी तर आभार संपत तोडकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button