दोन कंटेनर मध्ये चिरडून तरुणाचा दुर्देवी मृत्यू .

(हेमंत सुरेश देशमुख)
उरण रायगड प्रतिनिधी
आज दिनांक 5/9/2022 रोजी उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील कोनेक्स टर्मिनल कंपनी यार्ड येथे मालाची हाताळणी करीत असताना प्रविण नेगी वय (37) राहणार उत्तराखंड या तरुणाचा दोन कंटेनर मध्ये चिरडून दुर्देवी मृत्यू झाला.
सदर घटना आज सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान घडूनही याबाबत अधिकृत माहिती कंपनी प्रशासन व पोलीस सूत्राकडून मिळालेली नाही सदर कामावर हा परप्रांतीय असून सदर घटनेबाबत कमालीची गुप्तता ठेवली जात आहे त्यामुळे ह्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे उरण तालुक्यात नियमांची पायमल्ली होत आहे प्रशिक्षित कामगार भरती न करता ठेकेदारी पद्धतीने मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे येथे सेफ्टी बाबत कोणतीही चेकिंग होताना दिसत नाही ह्यासाठी नवी मुंबई इंडस्ट्रिअल सेफ्टी डिपार्टमेंट ह्याबाबत कोणत्याही कंपन्या मध्ये पडताळणी करणे आवश्यक आहे तसेच गंभीर दखल घेणे गरजेचे आहे सदर दुर्देवी कामगाराची बॉडी उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालय येथे आणली असून तेथून सदर मयात कामगाराची बॉडी त्याच्या गावाला पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे आढळून आले परंतु स्थानिक उपस्थित नागरिकांनी ह्याबद्दल उठाव केल्यामुळे सदर प्रकरणात स्थानिक लक्ष ठेऊन आहेत त्यामुळेच ह्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
