शेतकरी हिताचे निर्णय होतात अंमलबजावणी होत नाही- माजी मंत्री गडाख यांची खंत

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी_
नेवासे तालुक्यातील माका येथे मा.मंत्री शंकरराव गडाख यांच्या विषेश प्रयत्नातुन,करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पन माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते करण्यात आले
राज्य सरकार कडून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत निर्णय ऐकताना आनंद वाटतो परंतु अमंलबजावणी होत नाही याची खंत वाटत असुन दुःखही वाटते, ज्यापक्षाने मंत्रीपद दिले त्यापक्षाला सोडणार नसल्याचे प्रतीपादन गडाखांनी या कार्यक्रमा प्रसंगी केले.
यावेळी, माका ग्रामस्थांच्या आग्रहखातर गडाखांच्या पाठपुराव्यास यश आले असुन, या ठिकाणी जलजीवन मिशन कार्यक्रम सन 2022/23 अंतर्गत पाणी योजना( 3.50 कोटी) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी_2 इमारत बांधणे( 30 लक्ष) ज्येष्ठ साहित्यिक मा. खा. यशवंतराव गडाख साहेब शॉपींग कॉप्लेक्स(1.65 कोटी), बाबीर बाबा (खेमनर वस्ती) सभामंडप बांधकाम (5 लक्ष) ,महादेव मंदीर सभामंडपासाठी (7लक्ष )रुपयांच्या योजनांच्या विकासकामांचे भूमिपूजन या विकास कामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने याप्रसंगी मा.जिल्हा पोलिस
अधीक्षक,मा.सरपंच नाथा घुले, सरपंच विजयाताई पटेकर,उपसरपंच अनिल घुले, सर्व ग्रा. सदस्य मा. सरपंच यादव शिंदे, लक्ष्मण पांढरे, अशोक खेमनर, मुळा स.बॅ. चेअरमन माणीक होंडे, मुळा स.सा.का रखाना मा. संचालक एकनाथ जगताप, मुळा शिक्षण समि तीचे बाजीराव मुंगसे, कृषी उत्पन्न बाजारचे मा. सभापती भगवान गंगावणे,सेवा.स.सो.चे चेअरमन डॉ. रघुनाथ पागिरे, व्हा.चेअरमन जबाजी पांढरे सर्व संचालक, अरुण पालवे, सुखदेव होंडे, बाबासाहेब पागिरे, लक्ष्मण बनसोडे, लहानु कांदे, आश्रु सानप,आशाबाई पटेकर, सुनीता पटेकर, ग्राम. चे ग्रामअधिकारी नांगरे व कर्मचारी,से.स.सोसा. चे सेक्रेटरी सांगळे व कर्मचारी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सानप यांनी तर, उपस्थितांचे आभार संजय गाडे यांनी केले.