देशविदेश

अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाची केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांसमवेत बैठक!

पुणे प्रतिनिधी

अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ (भारतीय मजदूर संघ) ची केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांच्या समवेत बैठक पार पडली

केंद्र सरकारकडून वीज दुरुस्ती कायदा 2021 आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर मागवलेल्या सूचनांवर भारत सरकारचे ऊर्जा मंत्री श्री आर के सिंगजी यांच्याशी अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाने सविस्तर चर्चा केली

. उप-परवाना प्रणाली, दीर्घ चर्चेनंतर मंत्री महोदयांनी ही व्यवस्था संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले. कर्मचार्‍यांच्या सेवाशर्ती, सुविधा, पेन्शन व सामाजिक सुरक्षा कायम ठेवण्याची व त्यात कोणतेही बदल न करण्याची विनंती संस्थेने केली, त्यावर माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेऊन यात छेडछाड न करण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे वीज कंपन्यांमधील रिक्त पदांची भरती, ग्रीड उपकेंद्रांचे कामकाज, जे सध्या बहुतांश खाजगी कंत्राटदारांकडून केले जात आहे, यावर त्यांनी आक्षेप घेतला, त्यावर मंत्री महोदयांनी राज्य वीज महामंडळांना नियमित कामासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या.

महासंघाने ऊर्जा क्षेत्रासाठी त्रिपक्षीय समितीची पुनर्रचना करण्याची मागणी केली, जी दीर्घकाळापासून अस्तित्वात नव्हती, जी औद्योगिक वितरण/उत्पादनासाठी होती, त्यावर माननीय मंत्री महोदयांनी समिती स्थापन करण्यास सहमती दर्शवली. त्याचप्रमाणे वीज दुरुस्ती कायदा 2021 बाबत येत्या काही दिवसांत अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे पदाधिकारी आणि त्यांच्या सर्व राज्यांच्या महामंत्र्यांसोबत एक मोठी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये दुरुस्तीबाबत सविस्तर चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. संघटनेला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल या चर्चेत एनटीपीसी, एनएचपीसी, पॉवर ग्रीडमधील कामगारांच्या प्रश्नांवरही संबंधित उद्योगांच्या संघटनांच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली.

या बैठकीत अखिल भारतीय संघटन मंत्री श्री बी.सुरेंद्रजी, विद्युत क्षेत्राचे अखिल भारतीय प्रभारी श्री अख्तर हुसेन, भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष व महामंडळाचे अखिल भारतीय प्रभारी श्री एल.पी. कटकवर, भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष श्री एस. मलेश्याम, अखिल भारतीय मंत्री (BMS) श्री गिरीशचंद्र आर्यजी, अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे सरचिटणीस श्री अमरसिग सांखला, ऊर्जा क्षेत्राचे प्रभारी श्री रामनाथ गणेश, अखिल भारतीय मंत्री श्री जयेंद्र गढवी, अध्यक्ष, एनटीपीसी, श्री अशोक कुमार, पॉवर ग्रीडचे महासचिव श्री पवन कुमार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button