सावरचोळ – मेंगाळवाडीत आदिवासी महिलेवर बिबट्याचा पुन्हा जिवघेना हल्ला… महिला थोडक्यात बचावली.

संजय साबळे
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द, येथील ( चंदन टेकडी ) परिसरात राहणाऱ्या मिराबाई रामभाऊ मेंगाळ ( वय वर्ष ६२) या महिलेवर बिबट्याने काल दिनांक ६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास , बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज बुधवार देि.७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सावरचोळ-मेंगाळवाडी येथील एका ४५ वर्षीय आदिवासी महिलेवर बिबट्याने प्राण घातक हल्ला करून जखमी केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मेंगाळवाडी येथील कातोरे. कुटुंब आपल्या (जानकुबाईचादरा) येथील शेतातील वस्तीवर आपल्या कुटुंबासोबत राहत होते.
काबाडकष्ट करून पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे गरीब कुटुंब शेतातील काम करून रात्रीच्या वेळेस घराच्या ओसरीत झोपले असताना पहाटे पाचच्या सुमारास सावजाच्या शोधात आलेल्या बिबट्याने जिजाबाई वसंत कातोरे या (वय ४५) वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला करून खांद्याला जोराचा पंजा मारून जखमी केल्याची घटना घडली आहे.
पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना अचानक जिजाबाई कातोरे यांच्यावर बिबट्याने खांद्यावर जोराचा पंजा मारल्याने जिजाबाई यांनी मोठ्याने आरडाओडा केला. अचानक आरडा ओरडा झाल्याने घरातील त्यांचा मुलगा, पती यांनी बचावासाठी आरडाओरडा केल्याने बिबट्याने त्या ठिकाणावरून धूम ठोकली.
दरम्यान या घटनेची खबर समजतात या कुटुंबातीलच बाळासाहेब कातोरे यांनी वनविभागातील शरद कानवडे यांना घटनेची खबर दिली असता कानवडे यांनी तात्काळ वनविभागाला दूरध्वनीवरून संपर्क करून घटनेची माहिती दिली. घटनेची खबर कळताच संगमनेर वन विभागाचे वनक्षेत्रपाल एक चे चे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे, वनपाल संगीता कोंढार, जोशना बेंद्रे व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन, जखमी झालेल्या जिजाबाई वसंत कातोरे यांना धांदरफळ खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवण्यात आले. डॉ. लोहारे यांनी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान कालची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा आदिवासी महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले त्या थोडक्यात बचावल्या आहेत.बिबट्याचे हल्ले वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सावरचोळ- मेंगाळवाडी, निमगाव खुर्द, परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत झाली असून, वन विभागाने आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जनजागृती करून तातडीने या परिसरामध्ये पिंजरे लावण्याची व्यवस्था करावी ,अशी आदिवासी बांधवांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.