इतर

श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने सातवे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न-

संजय महाजन
शिर्डी प्रतिनिधी

श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने सातवे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर साई9 ग्रुप कार्यालय शेजारील अयोध्या हॉस्पिटलच्या जागेत पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडले.
यावेळी उपस्थित शंकरा आय हॉस्पिटल चे श्री.डॉ प्रकाश पाटील व बंगलोर येथील डॉ. सौ. रेणुका व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


29 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या शिबिरात जवळपास 845 रुग्णांची मोफत तपासणी होऊन 70 पेशंट ला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी मुंबई येथे नेण्यात आले. शिर्डी शहर व परिसर तसेच कल्याण, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर , येवला, जालना, संगमनेर मालेगाव,जळगाव, श्रीरामपूर, नाशिक, नेवासा,राहाता, कोपरगाव,आशा अनेक ठिकाणांहून आत्तापर्यंत 6200 गरजू व वयोवृद्ध रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला. व आत्तापर्यंत 550 पेशंट ची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई येथे यशस्वीरित्या पार पडली. ट्रस्ट चे हे कार्य अल्पावधीतच भारतात नावारूपास येत आहे. अशा प्रकारची सेवा ट्रस्ट च्या वतीने अविरतपणे सुरू राहील व 24 नोव्हेंबर 2024 रोजी सुद्धा आठवे मोफत शिबीर आयोजित केले असून याचा फायदा देशातील अनेक गरजूंनी घ्यावा असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे- गायकवाड पाटील केले
कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.संगीता गायकवाड पाटील व साई9 ग्रुप चे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button