महाराष्ट्र

लोणीच्या दिशेने निघालेले लाल वादळ थांबले !

अकोले प्रतिनिधी

शेतकरी ,कष्टकरी ,कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी अकोल्यातून लोणीच्या दिशेने निघालेले लाल वादळाचा धसका शासनाने घेतला राज्यभरातून हाजारो आंदोलक लोणीच्या दिशेने निघाले हे वादळ पायी मोर्चाने रात्री संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे पोहचले असता प्रशासनाला खडबडून जाग आली . आंदोलनकर्ते यांना ऊन व पाऊस याचा संदर्भ देत प्रशासनाने मोर्चा सुरू करू नये अशी नोटीस बजावली असतानाही शासनाचे आदेशाला न जुमानता निघालेले या लाल वादळाचा धसका प्रशासनाने घेतला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते, मात्र त्यानंतरही आंदोलक ठाम राहीले व सायंकाळी पंधरा किलोमीटरचे अंतर कापत संगमनेर तालुक्याच्या हद्दीत धांदरफळ येथील रामेश्वर मंदिरात आंदोलनकर्ते नी तळ ठोकला. आज गुरुवारी दुपारनंतर हा लाँगमार्च वडगावपान मध्ये मुक्कामी पोहोचणार होता. मात्र तत्पूर्वीच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ . महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदिवासी विकास व कामगार कल्याण खात्याच्या मंत्र्यांसह आंदोलनाचे निमंत्रक कॉ.डॉ.अजित नवले यांच्यासह अन्य बत्तीस मोर्चेकर्‍यांशी संगमनेरच्या प्रशासकीय भवनात चर्चा सुरू केल्या.

अखिल भारतीय किसान सभेने आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढला होता. हा मार्च शहापूर तालुक्यात पोहोचल्यानंतर शासनाने त्यांच्याशी वाटाघाटी करुन काही गोष्टींची तत्काळ पूर्तता केली तर प्रमुख गोष्टी ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. त्याचा कालावधी संपूनही राहिलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने राज्य सरकारला आश्‍वासनांची आठवण देण्यासाठी किसान सभेने बुधवारी सायंकाळी अकोल्यातून लोणीच्या दिशेने प्रवास सुरु केला. रात्री दहाच्या सुमारास हे लाल वादळ संगमनेर तालुक्यात धांदरफळ शिवारात रामेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात येवून विसावलं.

सकाळी रामेश्‍वर ते अकोले रस्त्यावरील खतोडे लॉन्सपर्यंत प्रवास ठरला होता. दुपारच्या जेवणानंतर काहीसा विसावा आणि त्यानंतर उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर संगमनेर शहर ओलांडून नऊ किलोमीटर अंतरावरील वडगावपान मध्ये जावून थांबणार होता. मात्र तत्पूर्वीच सकाळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी डॉ.अजित नवले यांच्यासह प्रमुख आंदोलकांशी रामेश्‍वर मंदिराच्या प्रांगणातच संवाद साधला.
आंदोलकांनी चर्चेतून मार्ग काढावा असे आवाहन महसूलमंत्री विखे यांनी केले होते. मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाने संगमनेरात चर्चेची तयारी दाखवल्यानंतर संगमनेरच्या प्रशासकीय भवनात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रशासकीय भवनात दीर्घ चाललेल्या बैठकीत किसान सभेने मांडलेल्या बहुतेक मुद्द्यांवर एकमत झाले.

किसान सभेच्या लॉन्ग मार्चमधील
आंदोलकाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित आणि कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळास सांगितले.
त्यामुळे अकोले ते लोणी असा निघालेला लॉन्ग मार्च हा संगमनेरमधील धांदरफळमध्ये स्थगित करण्यात आला असल्याची घोषणा किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांनी केली.भारतीय किसान सभेच्या हाकेला साथ देत राज्याच्या कानाकोपऱ्यातून २० ते २५ हजार शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासी कामगार या लॉन्ग मार्चमध्ये सहभागी झाले होते. या आंदोलकांच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये गायरान जमीन, दूध धोरण, दूध एफआरफी समितीचे न झालेले गठण, दूध आयातीला विरोध या मागण्यांचा समावेश होता. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनानत नुकसान झाले. अनेक भागात फळबागा मातीमोल झाल्या. आंब्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. ही नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशीही मागणी किसान सभेने केली आहे.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने केंद्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, राज्य सेक्रेटरी डॉ. अजित नवले यांनी कष्टकरी शेतकरी, कामगार आणि आदिवासीं यांच्याबाबत केलेल्या मागण्यांवर विचार विनिमय करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित आणि कामगार मंत्री सुरेश खाडे, आदिवासी प्रशिक्षण संशोधन संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारुड, आदिवासी
विकास आयुक्त नयना गुंडे, महसूलचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रांत अधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे, आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या उपस्थितीत धांदरफळच्या रामेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात आंदोलकांसमवेत बैठक झाली
आंदोलक किसान सभेच्या वतीने निमंत्रक डॉ.अजित नवले यांच्यासह डॉ.अशोक ढवळे, उमेश देशमुख, चंद्रकांत गोरखाना, किसन गुजर, रडका कलांगडा, यशवंत झाडे, उद्धव पोळ, माणिक अवघडे, रमेश चौधरी, चंद्रकांत वरण, विजय काटेला, शंकर सिडाम, अजय बुरांडे, गोविंद आर्दड, अनिल गायकवाड, महादेव गारपवार, अमोल वाघमारे, सदाशीव साबळे, किरण गहला, डॉ.अशोक थोरात, संगिता साळवे, सुनिता पथणे, सचिन ताजणे, नामदेव भांगरे, निर्मला नागे, रंजना पर्‍हाड, डॉ.करण घुले, नंदू डहाळे, संतोष वाडेकर, अण्णासाहेब शिंदे, अनिता साबळे अशा एकूण 33 आंदालकांचा समावेश होता.

बुधवारपासून (दि. २६ ते २८) या दरम्यान
अकोले ते लोणी असा राज्यव्यापी पायी मोर्चा काल सुरू झाला होता अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय,समविचारी एसएफआय या संघटनांच्या सहभागाने आयोजित हा मोर्चा तीन दिवस पायी चालून,महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार होता.
मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा
तीव्र केला जाणार होता


——–/////———–


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button