आजचे पंचांग व राशिभविष्य दि. १०/०९/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १९ शके १९४४
दिनांक :- १०/०९/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३५,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति १५:२९,
नक्षत्र :- शततारा समाप्ति ०९:३७,
योग :- धृति समाप्ति १४:५४,
करण :- बालव समाप्ति २६:१८,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:२२ ते १०:५४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:५८ ते ०३:३१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३१ ते ०५:०३ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
प्रोष्ठपदी पौर्णिमा, भागवत सप्ताह समाप्ति, पौर्णिमा-प्रतिपदा महालयारंभ, संन्यासिनां चातुर्मास समाप्ति, कुलधर्म, अन्वाधान,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १९ शके १९४४
दिनांक = १०/०९/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन वाचन वा लिखाण चालू करावे. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. फिरायला जाण्याची संधि मिळेल. नवीन ओळख होईल.
वृषभ
घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. व्यापार्यांनी आळस दूर सारावा. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. सामाजिक कामात सहभागी होता येईल.
मिथुन
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. मित्रांशी सलोख्याने वागावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. निराशाजनक विचार करू नका. जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी.
कर्क
गरज नसताना आक्रमक होऊ नका. बौद्धिक कौशल्य दाखवा. घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.
सिंह
मुलांचे प्रेम वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
कन्या
बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल. घरातील लोकांशी सल्लामसलत करावी. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. रचनात्मक कामे करावीत. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.
तूळ
जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. छोटे प्रवास घडतील. वैयक्तिक समस्या सोडवता येतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते.
वृश्चिक
मनाची चलबिचलता जाणवेल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल. क्षुल्लक मानसिक समस्या जाणवू शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा.
धनू
तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. टीकेकडे लक्ष देऊ नका.
मकर
व्यापारासाठी योग्य काळ. कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील. अधिकारी तुमचे कौतुक करतील. दिनक्रम व्यस्त राहील.
कुंभ
नवीन गोष्टी शिकाल. भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी. गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. मनाचा आवाज ऐकावा.
मीन
घाईघाईने निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर