इतर

पंचनाम्या साठी पैसे उकळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

नेवासा तालुक्यातील संतापजनक प्रकार

नेवासा/ प्रतिनिधी

अतिवृष्टी मुळे शेतकरी पुरता हवालदील झाला. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेले आहे. अशा या पेच प्रसंगात शासनाने पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले मात्र पंचनाम्यासाठी पैसे उकळून शेतकऱ्यांचे टा ळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार अधिकारी करत आहे तसा
धक्कादायक प्रकार समोर आला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यातच असा प्रकार उघड झाल्याने अखेर पैसे उकळणाऱ्या
अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या
जिल्ह्यात आज एक धक्कादायक प्रकार समोर
आला. नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी इथं
शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात होते. महसूल
विभागाने नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी

केली जात होती. अखेरीस या प्रकरणी कृषी
अधिकाऱ्यांसह पैसे मागण्साठी आलेल्या
अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात
आली आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांच्या जिल्ह्यात आज एक धक्कादायक प्रकार
समोर आला. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी
एकरी चारशे रुपये मागितले जात होते. दैनिक
देशरत्न वृत्तपत्राने या प्रकरणाचा वाचा फोडली.
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी इथं

  • शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात होते. महसूल
    विभागाने नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी
    केली जात होती. अखेर या व्हिडीओची कृषिमंत्री
    अब्दुल सत्तार यांनी दखल घेतली. शेतकऱ्यांना

पंचनामे साठी पैसे मागणारा अधिकाऱ्यांवर
निलंबनाची कारवाई केली. रोहिणी सुभाष मोरे
कृषी सहाय्यक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई
केली आहे. तसेच चिलेखनवाडी ग्रामपंचायतीच्या
ग्रामसेवकासह कर्मचारी निलंबित करण्यात आले
आहे. काय आहे प्रकरण? नेवासा तालुक्यातील
चिलेखनवाडी इथं शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात
होते. एका सजग शेतकऱ्याने हा सर्व प्रकार
आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. एकरी
400 रुपये मागितले जात आहे. एवढंच नाहीतर या
कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी पैसे
दिले याची यादीही ते निर्लज्ज पणे दाखवत आहे. या संतापजनक प्रकारा विषयी जिल्ह्यात मोठा असंतोष व्यक्त होत आहे

घेतले जात आहे. या प्रकरामुळे अतिवृष्टीने
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त
केला जात आहे. कामगार तलाठी आणि
ग्रामसेवकाकडे कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी
केली आहे. विशेष म्हणजे, महसूलमंत्री राधाकृष्ण
विखे पाटील यांनी नुकसान ग्रस्त भागाचा दौरा
केला होता, त्यावेळी पंचनामे करण्याचे आदेश दिले
होते. पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून
अद्यापही वंचित आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या
जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार समोर
आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button