कळस बु येथील अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

अकोले प्रतिनिधी
अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या किनारी वसलेल्या, प. पु. सुभाष पुरी महाराज यांचे वास्तव्याने पुनीत झालेल्या कळस बु येथील अखंड हरिनाम सप्ताह गावातील कीर्तनकार, गायक व मृदुंगमनी, हार्मोनियम वादक यांनीच आदर्श कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
भाद्रपद ऋषीपंचमी ते वामनजयंती या तीथीप्रमाणे सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात आला. कळस येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झालेबद्दल मंदिरात कळसेश्वर भजनी मंडळ च्या वतीने गावातील किर्तनकार, वादक, गायक व मृदुंगमनी, हार्मोनियम वादक यांनी हा सप्ताह सोहळा साजरा करण्यात आला. अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त हभप विष्णू महाराज वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाने कळस गावातील पल्लवीताई वाकचौरे, कैलास महाराज आहेर,देवा महाराज वाकचौरे, दिपक महाराज देशमुख, गायनाचार्य अरुण महाराज शिर्के, काल्याची सेवा मृदुंगाचार्य गणेश महाराज वाकचौरे यांनी कीर्तनरुपी सेवा सादर केली. हभप गंगा बाबा वाकचौरे यांनी विना हार्मोनियम सुर्यकांत ढगे, देवचंद वाकचौरे मृदुंग सोपान जमधडे गायक डॉ विकास वाकचौरे चोपदार बाजीराव ढगे यांनी ज्ञानेश्वरी पारायण पौरोहित्य हरिश्चंद्र वाकचौरे, काकडा भजन व नियमाचे भजन जागर कळसेश्वर भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ यांनी केला. यावेळी जिप सदस्य कैलासराव वाकचौरे यांचे हस्ते कै. कारभारी तबाजी वाकचौरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मृदंग देण्यात आला त्याबद्दल गोरख वाकचौरे व महाप्रसाद पंगत बद्दल दादाभाऊ वाकचौरे, शांताराम वाकचौरे, शरद वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प.पु. सुभाष पुरी महाराज यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक काढण्यात आली.