मातोश्री शैक्षणिक संकुलामध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम

पारनेर/प्रतिनिधी
: मातोश्री संकुल मध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
गणेश उत्सवा मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मेंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, जनरल नॉलेज स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी घेण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आला
.दरम्यान मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबविले आहेत भारतीय सण व उत्सव मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये साजरे होत असतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम नेहमी राबवले जातात. कलात्मक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान मध्ये उपक्रम घेतले जातात. गणेश उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कोरोनाचे संकटात पूर्णतः गेल्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले
. मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर यावेळी म्हणाले की युवक युवती या देशाचे भवितव्य आहे विद्यार्थी जीवनामध्ये त्यांच्या कलात्मक गुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबवण्यासाठी तत्पर आहोत ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान मध्ये शिक्षण घेत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

गणेश उत्सवा दरम्यानचे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर, संचालिका डॉ. श्वेतांबरी आहेर, संचालिका शितल आहेर, रजिस्टार यशवंत फापळे, प्राचार्य राहुल सासवडे, प्राचार्य आसिफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व सर्वात शेवटी भव्य अशी मिरवणूक काढून गणेश उत्सवाची सांगता करण्यात आली. मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.