येळकोटच्या गजरात कोरठण खंडोबा भाद्रपद पौर्णिमा उत्सव संपन्न

पारनेर प्रतिनिधी
–लाखो भाविकांचे कुलदैवत असणारे श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान (पिंपळगाव रोठा, ता. पारनेर,) जि. अहमदनगर या राज्यस्तरीय ” ब ” वर्ग तीर्थक्षेत्रावर भाद्रपद पौर्णिमेनिमित्त शनिवार( दिनांक १० सप्टेंबर रोजी भक्तांच्या गर्दीत आणि जय मल्हार येळकोटच्या गजरात संपन्न झाला.
ओढे नाले तलाव ओसंडून वाहत असताना निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत भक्तांनी कुलदैवत खंडोबा भक्तीचा मनमुराद आनंद अनुभवला.
स.६.०० वाजता श्री खंडोबा मंगल स्नान पूजा साज शृंगार झाल्यावर अभिषेक महापूजा सकाळी सात वाजता श्री विक्रम व सौ रूपाली लामखडे श्री प्रकाश व सौ सारिका लामखडे श्री भाऊसाहेब व सौ नीलम लामखडे सर्व राहणार मंगरूळ तालुका जुन्नर आणि श्री रामदास मुळे मांजरवाडी यांच्या हस्ते झाली स.८.०० वाजता महाआरती श्री महादेव बबन लामखडे राहणार मंगरूळ यांच्या हस्ते झाली.
स १०.०० वा. श्री खंडोबा उत्सव मूर्तीची पालखी मिरवणूक सवाद्य वाजंत्री ताफ्यावर मंदिरातून प्रस्थान झाली. ढोल लेझीमच्या तालावर पालखी पुढे लेझीम डाव खेळत भाविकांनी पालखीसह मंदिर येळकोटच्या गजरात कोरठण खंडोबा भाद्रपद पौर्णिमा उत्सव संपन्न घातली. पालखीवर भांडार खोबरे उधळत येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष सर्वत्र चालला होता. वातावरणात भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. विसावा घेऊन पालखी पुढे आल्यावर पालखी पुढे लंगर तोडण्यात आला. त्यावेळी भाविकांनी भंडार उधळीत खंडोबाच्या नावाने जयघोष केला. पालखीला नैवेद्य अर्पण झाल्यावर पालखी परत मंदिरात विराजमान झाली. नंतर महाप्रसाद वाटप सुरू झाले. श्री महादेव बबन लामखडे, श्री सुभाष हरिभाऊ लामखडे, श्री पिराजी लामखडे, श्री दावला बापुराव खुटाळ रा.मंगरूळ ता. जुन्नर यांच्या वतीने सर्व भक्तांना लापशीचा महाप्रसाद देण्यात आला.
देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी, दर्शनबारी ,वाहने पार्किंग इत्यादी नियोजन केलेले होते.