राजेश्वरी कोठावळे हाफकिडो बॉक्सिंगच्या चेअरमन’पदी

पारनेर/प्रतिनिधी
:हाफ किडो बॉक्सिंग महाराष्ट्र ऑर्गनायझेशन या संघटनेच्या चेअरमन पदी अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष राजेश्वरी कोठावळे यांची निवड झाली.या पदाची निवड प्रक्रिया ही लोणावळा येथे पार पडली यावेळी राजेश्वरी कोठावळे या विजयी झाल्या.हापकिडो बॉक्सिंग महाराष्ट्र ऑर्गनायझेशन या संघटनेच्या माध्यमातून राजेश्वरी कोठावळे अनेक दिवसांपासून कार्यरत आहेत अनेक खेळाडूंना त्यांनी आजपर्यंत प्रशिक्षण दिले आहेत त्या एक आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तसेच एक उत्तम खेळाडू सुद्धा आहेत हाफ किडो बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य ऑर्गनायझेशनच्या चेअरमन’पदी त्यांना संधी मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने पारनेर तालुक्याला आता राज्यस्तरावर बहुमान मिळाला आहे.राजेश्वरी कोठावळे या एक उत्तम समुपदेशक आहेत बॉक्सिंगच्या माध्यमातून त्यांनी अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी आजपर्यंत पारनेर तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यामध्ये १० ते १२ हजार खेळाडूंना यशस्वी बॉक्सिंग प्रशिक्षण दिले आहे.कोठावळे यांची महाराष्ट्र राज्य हाफ कीडो बॉक्सिंग या संघटनेच्या चेअरमन’पदी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांना राज्यस्तरावर संघटनात्मक पातळीवर काम करण्यास मिळणार आहे आणि हा पारनेर तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे.निवडीनंतर राजेश्वरी कोठावळे म्हणाल्या की हाफ किडो बॉक्सिंग या संघटनेच्या चेअरमन पदी निवड झाल्यामुळे या पुढील काळामध्ये बॉक्सिंग कराटे या खेळांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणार आहे शासन स्तरावर प्रयत्न करून ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य ती संधी मिळण्यासाठी यापुढील काळात संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहे.राजेश्वरी कोठावळे यांच्या निवडीनंतर त्यांना पारनेर नगरचे आमदार लोकनेते निलेश लंके, राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर यांनी अभिनंदन केले आहे व पुढील कार्य शुभेच्छा दिल्या.