गुफा शाळेच्या शिक्षिका मीरा नितनाथ यांना राष्ट्रीय पुरस्कार

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव- नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाट्या जवळील गुफा येथील प्राथमिक शिक्षिका मीरा अशोक नितनाथ यांना मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच अकादमीचे अमोल सुपेकर व कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २००८ पासून गुंफा येथील प्राथमिक शाळेत त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण करून मुलांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल. हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या शाळेसाठी भरपूर वेळ घेऊन मुलांमध्ये रमून काम केले आहे. यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेक शिक्षकांनी मीरा नितनाथ यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या पुरस्काराबद्दल माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. राजश्रीताई घुले, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, भातकुडगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार रवींद्र मडके, आर. आर. माने, सुनील पहिलवान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष शहाराम आगळे, देवटाकळी केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख सुभाष शेटे, शेतकरी बचाव जन आंदोलनाचे तालुका अध्यक्ष एकनाथ काळे, नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. सागर चव्हाण, संतोष गोसावी, हरिभाऊ चोपडे, अशोक पोपळघट, कृष्णा वाघमोडे यांच्यासह भातकुडगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
लवकरच नागरी सत्कार….
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ राजश्रीताई चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली
भातकुडगाव ग्रामपंचायत, राष्ट्रवादी महिला आघाडी व परिसराच्यावतीने लवकरच विविध पुरस्काराने सन्मानित झालेल्या ग्रामीण भागातील शिक्षकांचा सन्मान सोहळा श्री. क्षेत्र काळेश्वर देवस्थानच्या भव्य दिव्य अशा सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात शिक्षक करत असलेल्या कामाचे या निमित्ताने कौतुकही करण्यात येणार आहे.
सौ. नंदाताई शंकरराव नारळकर
ग्रामपंचायत भातकुडगाव