इतर
सुगाव येथील दिनकरराव देशमुख यांचे निधन

अकोले /प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील जुन्या पिढीतील दिनकरराव दादासाहेब देशमुख( वय-९३) यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले
.’आण्णा’ या नावाने अकोले तालुक्यात ते सुपरिचित होते.अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख शांताराम देशमुख,सौ. उज्वला संपत देशमुख, सौ.पुष्पलता देवेंद्र देशमुख यांचे ते वडील होत.तसेच लोपमुद्रा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विवेक दशरथ देशमुख यांचे ते आजोबा होत.त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी सुगाव बुद्रुक येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर ,नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
——-