इतर
वाढदिवसाच्या निमित्ताने उस्थळदुमाला , बाभूळवेढा शाळेला सी.सी.टी. व्ही.कॅमेरे शालेय वस्तूचे वाटप

सोनई -प्रतिनिधी-- विजय खंडागळे
- उस्थळ दुमाला ( ता.नेवासा) येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष व सेवा सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र गायकवाड यांनी आपला वाढदिवस डोलामोलात साजरा न करता वडील स्व.पंढरीनाथ गायकवाड व चुलते स्व.द्वारकानाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ उस्थळदुमाला येथे शाळेकरिता सी.सी.टी. व्ही.कॅमेरे संच व बाभुळवेढा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप पंचायत समितीचे उप सभापती किशोर जोजार यांचे हस्ते करण्यात आले.
अध्यक्ष स्थानी सेवा सोसायटीचे अध्यक्ष देविदास वाघ हे होते.उद्योजक राजेंद्र गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने ग्राहक संरक्षणचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ चिंधे म्हणाले,जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनातुन वाढदिवस हा समाजउपयोगी असावा असे सांगून प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले.
संदीप आढाव,व राजेंद्र शेळके यांनी आपलाही काही हातभार असावा म्हणून उस्थळ दुमाला व बाभुळवेढा या गावातील शाळेत जाऊन वह्या,पेन,आदी वस्तूचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रशांत सुकाळकर म्हणाले, भावी पिढी घडवण्यासाठी गायकवाड परिवाराने हा उपक्रम हाती घेतला, हे कौतुकास्पद असल्याचे सांगून एक आदर्श निर्माण केला.
यावेळी उपसभापती किशोर जोजार ,ग्राहक संरक्षणचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ चिंधे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राधाकिसन वाघ,किशोर सुकाळकर, सेवा सोसायटीचे चेअरमन देविदास वाघ,जयसिंग गायकवाड, कैलास पिटेकर,दादा वाघ,जनार्धन पिटेकर,त्रिंबक भदगले,राजेंद्र सानप,नामदेव सुकाळकर, अशोक बर्डे,मोहन सकट, रावसाहेब आठरे, रखमाजी आढाव,ज्ञानदेव दिघे,आदी उपस्थित होते.
प्रस्ताविक प्रा. निकरट व आभार मुख्यध्यापक कांडेकर यांनी मानले.