भाळवणी येथील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य : सुजित झावरे

पिराचा मळा येथे नवीन अंगणवाडीचे भूमिपूजन
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
: भाळवणी येथील पिराचा मळा येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या नवीन अंगणवाडी खोलीचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
.
पिराचा मळा येथील नवीन अंगणवाडी खोलीचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते झाले यावेळी ते म्हणाले की भाळवणी हे गाव तालुक्यातील व परिसरातील मोठे बाजारपेठेचे गाव आहे. भाळवणी येथील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी प्राधान्याने प्रयत्न केला आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी व गावातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असून खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला चालना देणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले
यावेळी सरपंच लीलाबाई रोहोकले, संदीप कपाळे, पाराजी रोहोकले गुरुजी, मा. सरपंच सुरेश रोहोकले, जितू रोहोकले, मारुती रोहोकले, भाऊसाहेब रोहोकले, सूर्यभान रोहोकले, संतोष मोरे, बबू जोशी गुरुजी, छाया रोहोकले, नारायण राऊत, प्रसाद रोहोकले, तसेच गावातील व वस्तीमधील ग्रामस्थ, महिला वर्ग, शाळकरी मुले उपस्थितीत होती