मातृभाषेबरोबर सगळ्या भाषांचा विकास झाला पाहिजे – सुदर्शन डंग

संगमनेर/प्रतिनिधी –
१४ सप्टेंबर रोजी स्वतंत्र भारता चे संविधानाने हिंदीला राष्ट्रभाषा आणि देवनागरीला राष्ट्रलिपी घोषित केले. हिंदी भाषा भारताची ओळख आहे. देशाचे हित साधणाऱ्या नेत्यांनी समाज सुधारकांनी हिंदी राष्ट्र भाषा म्हणून अनुभवली आहे. हिंदी भाषेमुळे भारतात कोणत्याही कोपऱ्यात व्यक्ती गेला तरी फारशी अडचण येत नाही . जगामध्ये अधिक बोलली जाणाऱ्या तीन भाषेपैकी एक भाषा हिंदी भाषा आहे. जगातील विश्वविद्यालयात हिंदी भाषेला स्थान दिले आहे. जर आपण हिंदी भाषी क्षेत्रात अहिंदी भाषेचा आणि अहिंदी भाषेच्या क्षेत्रात हिंदी भाषेचा प्रसार केला तर देशात एकता आणण्यासाठी ती मोठी मदत होईल . भाषेने अनेक हिंदी साहित्यक दिले असून त्यांचे हिंदी साहित्य आजही अजरामर आहे. संगीतात हिंदी शब्दांनी स्वर ओळखली जातात. उर्दू आणि हिंदी भाषा यांचे नाते सलोख्याचे आहे म्हणूनच हिंदी भाषा बोलताना उर्दू शब्द आले तर अधिकच गोडवा निर्माण होतो. संगमनेर साहित्य परिषद आयोजित ‘हिंदी भाषा दिन’ साजरा झाला त्यावेळी अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या प्राचार्य श्रीमती सुदर्शन डंग या बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी नगरसेवक डॉ.दानिश खान म्हणाले हिंदी भाषेचा आज गौरव होताना पाहून आनंद होत आहे, काही अंतर ओलांडले तरी बोली भाषा बदलते परंतु हिंदी भाषा अनेक भाषिकांच्या हृदयात बसली आहे. या भाषेचा प्रसार होण्यासाठी संगमनेर साहित्य परिषदेने घेतलेल्या या कार्यक्रमामुळे हिंदी भाषा समृद्ध होण्यास निश्चितच मदत होईल.

यावेळी डॉ.जी.पी. शेख आणि साजिद खान यांनी मनोगत व्यक्त केली. सुरेश परदेशी आणि मंगला पाराशर यांनी हिंदी रचना सादर केल्या.
लावणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार विजेत्या संगमनेरच्या जेष्ठ कलावती गुलाबमावशी संगमनेरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
व्यासपीठावर व्याख्यात्या श्रीमती सुदर्शन डंग, माजी नगरसेवक डॉ. दानिस खान , जगप्रसिद्ध गायक मोहमद रफी साहेब यांचे बरोबर स्टेज परफॉर्मन्स करणारे आणि हिंदी शेरशायरीचे जाणकार के. सी. खुराणा , संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर , डॉ.जी.पी.शेख हे होते.
यावेळी हिंदी शिक्षिका प्रतिभा रोहम आणि शिक्षक आर. ई .गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश परदेशी यांनी केले आणि आभार लक्ष्मण ढोले यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकल्प प्रमुख शेख इद्रिस, गिरीष सोमाणी, ज्ञानेश्वर राक्षे, मनोज साकी आणि संगमनेर साहित्य परिषदेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास संगमनेरमधील श्रोते आणि संगमनेर साहित्य परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्तित होते.
