इतर
राजापूर महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा संपन्न

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 15 सप्टेंबर 2022रोजी आविष्कार स्पर्धा उत्साहात पार पडली
.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण कल्पना स्पर्धेत सादर केल्या.विद्यार्थ्यांना यासाठी महाविद्यालयातील अर्चना साबळे,भालेराव मॅडम,वाकचौरे मॅडम आहेर सर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.अविष्कार कॉर्डिनेटर सुभाष वर्पे ,IQAC कॉर्डिनेटर संगीता जांगिड,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.संतोष गोर्डे व कला विभाग प्रमुख प्रा. हारदे यांनी परीक्षण केले.