अहमदनगरइतर

हॉलीबॉल खेळात राज्यात उत्तम खेळाडू तयार करणार–आमदार निलेश लंके


   दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी

:– डायरेक्ट हॉलीबॉल राज्यात तळागाळात पोहोचवून उत्तम खेळाडू तयार करणार, असे मार्गदर्शन आमदार तथा डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे अध्यक्ष आमदार निलेश लंके यांनी केले.

पुणे येथे राष्ट्रवादी भवनच्या सभागृहात आयोजित राज्य असोसिएशनच्या सभेत अध्यक्ष पदावरून बोलत होते.    यावेळी राज्य असोसिएशनचे नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी, सदस्य, विविध समित्यांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. 

   यावेळी मार्गदर्शन करताना आमदार श्री.लंके पुढे म्हणाले की, ही संघटना राज्यात नावारुपाला आणून राज्यातील सर्व जिल्ह्यात हा खेळ जास्तीत जास्त कसा रुजवता येईल याकडे मी स्वतः लक्ष देईन असे सांगून राज्य व राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रातच भरविल्या जातील, यासाठी कोणती कमतरता भासू देणार नाही असे सांगितले.

आमदार श्री.लंके म्हणाले की, महाराष्ट्र डायरेक्ट हॉलीबॉल खेळाडूसाठी कुठलेही प्रकारची अडचण भासू देणार नाही, सदैव आपल्या सोबत असल्याची भावना व्यक्त करून सर्व जिल्ह्यात यापुढे दौरा करुन खेळाडूंना डायरेक्ट हॉलीबॉलच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. संघटना वाढीसही भर दिला जाईल. 

    यावेळी महाराष्ट्र राज्य डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी शरद कदम यांनी डायरेक्ट हॉलीबॉल खेळाचा नियम व अटी याविषयी उत्तम मार्गदशन करून असोसिएशनची कार्यकारणी व समित्या जाहीर करून भविष्यात होणाऱ्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा उत्तम प्रकारे पारपाडून या खेळाला नावलौकिक मिळवून देण्याचा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांवतीने व्यक्त केला.

याप्रसंगी राज्याच्या कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या आमदार निलेशजी लंके, सचिव शरदजी कदम आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे अखिल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे अध्यक्ष बिपिनची चहल यांच्यावतीने उपाध्यक्ष प्रा.बाबा बाविस्कर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  या राज्यस्तरीय सभेसाठी  22 जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.    यावेळी नवीन कार्यकारणी तयार करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे आहे.- अध्यक्ष आमदार निलेश लंके जिल्हा अहमदनगर, उपाध्यक्ष प्रा.बबन झावरे, अहमदनगर जिल्हा, सुरेशचंद्र बाविस्कर, धुळे जिल्हा, ॲड.कौस्तुभ देशमुख, पुणे जिल्हा, जनरल सेक्रेटरी शरद कदम रायगड जिल्हा, संजय लाकूड झोडे अहमदनगर जिल्हा, सचिन पाटील जळगाव जिल्हा, प्रफुलचंद्र वाघ बीड जिल्हा, धैर्यशील दळवी सातारा जिल्हा, सोयब बेगमपुरे सोलापूर जिल्हा, खजिनदार रविंद्र म्हात्रे रायगड जिल्हा, सह खजिनदार चंद्रमान ठुबे  अहमदनगर जिल्हा, सदस्य दीपक पाटील, कोल्हापूर जिल्हा, जिल्हा प्रसिध्दी कमिटी हिरामण भोईर, सेक्रेटरी रायगड जिल्हा अमित जगताप रायगड जिल्हा, विनोद गफार सोलापूर जिल्हा, पंच कमिटी प्रसन्नकुमार पाटील, सेक्रेटरी रायगड जिल्हा सुनील म्हात्रे, स्वप्निल होनमुठे सोलापूर जिल्हा, नरेंद्र महाजन जळगाव जिल्हा.     तांत्रिक कमिटी : रमेश म्हात्रे-सेक्रेटरी-रायगड, राजेंद्र तांबे-अहमदनगर, दत्तात्रेय बांडे-पुणे, धिरज घुले-पुणे, मुकुंद शिंदे-पुणेयावेळी प्रास्ताविक तांत्रिक कमिटीचे सेक्रेटरी रमेश म्हात्रे यांनी  केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button