लंम्पी बाधित जनावरांसाठी छावण्या उभाराव्यात -,कृषिराज टकले
अहमदनगर– लंम्पी या आजारामुळे अनेक जनावरे बाधित झाले आहे शेतकऱ्यांना वरदान ठरणारा पूरक दुध व्यवसाय अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट या आजारामुळे आले आहे राज्यात अनेक जनावरे लंम्पी या आजाराने बाधित झाले आहे हा आजार संसर्गजन्यअसल्यामुळे निरोगी जनावरे सुध्दा लंम्पी बाधित होत आहे त्यामुळे सरकारने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणानुसार बाधित जनावरांसाठी विलगीकरण छावण्या उभारव्यात अशी मागणी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक कृषिराज टकले पाटील यांनी केली आहे
कोरोना मुळे अगोदरच अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे त्यात लंम्पी ने थैमान घातले आहे शेतकऱ्यांची या आजाराने पुर्णपणे आर्थिक घडी मोडकळीस आली आहे शेतकऱ्यांनी मोठया किंमती देवून जनावरे विकत घेऊन लंम्पी पासून पशुधन वाचवयाचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे त्यामुळे बाधित जनावरांसाठी विलगीकरण छावण्या उभारव्यात
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे पशुवैद्यकांनी लसीकरण करताना नवीन निडल वापरावी जेणेकरून बाधित जनावरांचा संसर्ग निरोगी जनावरास होणार नाही
लंम्पी बाधित जनावरांसाठी विलगीकरण छावण्या उभारव्यात यासाठी पशुसंवर्धन मंत्री ना,राधाकृष्ण विखे पाटील यांची लवकरच स्वाभिमानी मराठा महासंघाचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, अ,नगर जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे, युवा जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, प्रसिद्धी प्रमुख अमोल म्हस्के ,युवक जिल्हा कार्याध्यक्ष किशोर लोढे,मराठा सुकाणु समिती अध्यक्ष गणेश झगरे, शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर, नेवासा तालुका अध्यक्ष सुदाम थोर,राहुरी तालुका अध्यक्ष शरद खांदे , शेवगाव युवा तालुका कार्याध्यक्ष प्रविण भिसे आदि पदाधिकारी निवेदन देणार आहे