लिंगेश्वर पतसंस्था निवडणुकीत प्रभाकर फापाळे यांच्या पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

अकोले /प्रतिंनिधी
– अकोले तालुक्यातील लिंगदेव गावातील लिंगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित लिंगदेव या संस्थेची निवडणूक प्रतिष्ठतेची मानली गेली होती. या निवडणुकीत एकूण १५ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता . या मध्ये इतर मागास प्रवर्गातून श्री.भाऊसाहेब बाबुराव हाडवळे तर महिला राखीव प्रतींनिधी सौ .आशा परशुराम कानवडे ,सौ .सुलाबाई रावसाहेब कोरडे यांची बिनविरोध निवड झाली . एकूण सर्वसाधारण पुरुष आठ तर अनुसूचीत जाती जमाती मध्ये दोन उमेदवारमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली .यामध्ये सर्वसाधारण पुरुष मध्ये डॉ.देशमुख प्रल्हाद रामनाथ ,श्री.कानवडे बाळासाहेब भीमाजी ,श्री. चौधरी सुनील ज्ञानदेव ,श्री .फापाळे भाऊसाहेब भागा ,श्री.फापाळे प्रभाकर सीताराम ,श्री.कानवडे रामकृष्ण बाबुराव तर अनुसूचीत पुरुष प्रवर्गातून श्री.किसन भागा शेलार विजयी झाले . तर सर्वसाधारण पुरुष मध्ये श्री. कानवडे परशुराम बाबुराव ,फापाळे आनंदा तुळशीराम .तसेच मागास प्रवर्गातून श्री.बाळासाहेब विश्वनाथ आढाव हे पराभूत झाले.
या निवडणुकीत मुळा खोरे शिवसेना प्रमुख प्रभाकर फापाळे यांनी एक हाती सत्ता मिळविण्यात यश मिळविले . संस्था स्थापनेपासून प्रभाकर फापाळे यांचे या संस्थेसाठी मोलाचे योगदान आहे . तालुक्यातील सर्वात जास्त नफा देणारी एक नंबर पतसंस्था म्हणुन या संस्थेचे नाव अकोले तालुक्यात झळकत आहे . लिंगदेव गाव व परिसरातील शेतकरी ,व्यापारी यांना नव संजीवनी देणारी नावाजलेली संस्था आहे .या विजयी उमेदवारांचे लिंगदेव ग्रामस्त व परिसरातील नागरिकांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले . या संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेत एस .पी नेरे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले