शिंदे गटाच्या शेवगाव तालुका शिवसेना अध्यक्षपदी आशुतोष डहाळे यांची निवड

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकीय बदलानंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राज्यामध्ये अनेक दिग्गजांनी शिंदे गटात सामील होणे पसंत करून शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यामध्ये शिंदे गटात सामील होणाऱ्यांची गर्दी अजूनही सुरूच आहे. मराठवाड्याची प्रवेशद्वार असणाऱ्या शेवगाव तालुक्याच्या शेजारील श्री क्षेत्र पैठण येथे मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत उल्हासात सभा झाली. त्यानंतर अनेक ठिकाणच्या जिल्हा व तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या, त्यामध्ये शेवगाव तालुका अध्यक्षपदी शहरातीलच तरुण तडफदार आशुतोष दत्तात्रय डहाळे यांची निवड करण्यात आली. तशा आशयाचे पत्र प्रदेश सचिव संजय मोरे यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख अनिल शिंदे संपर्कप्रमुख सचिन जाधव शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी या निवडीचे पत्र दिले आहे. डहाळे यांची निवड झाल्यानंतर तालुक्यातील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटात सामील होण्याचे आवाहन करतो. सर्वसामान्यांच्या कुठल्याही प्रश्नासाठी आपण कटिबद्ध आहोत. आपणाला समाजकार्यातून आपली ताकत उभी करायची आहे. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवूनच आपण तालुक्यात कार्य करणार आहोत.आपण लवकरच पंधरा दिवसात शेवगाव तालुका कार्यकारणी निवड करणार आहोत.आशुतोष डहाळे
शेवगाव तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदे गट