पारनेर तालुक्यातील अवैंधरित्या चालविल्या जाणाऱ्या लॅब वर कारवाई करा- मनसे

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी अहिल्यानगर जिल्हा आरोग्य अधिकारी नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले आहे की पारनेर तालुक्यात परवाना धारक लॅब किती आहेत व विना परवाना अवैधरीत्या चालविल्या जाणाऱ्या लॅब किती आहेत तसेच पारनेर तालुक्यातील जनतेच्या जिवाशी टेस्ट च्या नावाने खेळ मांडला जात आहे हे दुर्दैवी आहे पारनेर तालुक्यातील लॅब धारकांनी आपली स्वतःची ओळख, नावासह शिक्षण, तपशिल बोर्ड, तसेच विविध चाचण्या संदर्भात नियमावली फलक कोणत्याही लॅब मध्ये लावण्यात आले नाहीत तसेच किरकोळ आजारी असताना गरज नसताना सुद्धा वेगवेगळ्या चाचण्यांच्या नावाने लोकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लुट करीत आहेत तसेच लॅब मध्ये लेडीज आणि पुरुषांसाठी बाथरुमसह आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा लॅबच्या नावाने पारनेर तालुक्यात आरोग्य अधिकारी यांच्या कृपा आशिर्वादाने गोरखधंदा जोरदार चालू असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे तसेच दिवसेंदिवस यात वाढ होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे परवानाधारक लॅब मध्ये विविध चाचण्या (टेस्ट) संदर्भात नियमावली फलक लावण्याचे बंधनकारक करण्यात यावे,जे लॅब चालक नियमावलीचे पालन करणार नाही त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा तसेच विना परवाना अवैधरीत्या चालविल्या जाणाऱ्या लोकांच्या जिविताशी खेळणाऱ्या लॅब वर त्वरित गुन्हा दाखल करुन बंद कराव्यात जर आरोग्य अधिकारी यांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि आठ दिवसांत कारवाईचा लिखीत स्वरुपात खुलासा केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर तालुक्यातील अवैधरित्या चालविल्या जाणाऱ्या लोकांच्या जिविताशी खेळणाऱ्या लॅबवर मनसे स्टाईल दनका दिला जाईल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यास पुर्णपणे जिल्हा आरोग्य अधिकारी अहिल्यानगर-पारनेर तालुका आरोग्य अधिकारी जिम्मेदार राहिल असा इशारा मनसे माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.