
अकोले प्रतिनिधी
अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूकीचा शेतकरी विकास मंडळाचा प्रचार शुभारंभ कळस येथील कळसेश्वर महादेवाला श्रीफळ वाढवून व प पु सुभाष पुरी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केला.
सुगाव बु येथील प्रचार शुभारंभ मेळाव्याचे अगोदर कळस येथे नेहमी प्रमाणे कळसेश्वर महादेवाचे दर्शन श्री. पिचड यांनी घेतले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक डी टि वाकचौरे, भाजपा तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक वाकचौरे, सागर वाकचौरे, राजेंद्र ढगे, लक्ष्मण आल्हाट आदी उपस्थित होते.
यावेळी कळसेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने अध्यक्ष विठ्ठल वाकचौरे, उपाध्यक्ष विष्णू वाकचौरे, सचिव गोपीनाथ ढगे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, नामदेव निसाळ, अवधूत वाकचौरे यांनी वैभवराव पिचड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला