वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
सोनई–नेवासा तालुक्यातील गेवराई विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सुभाष कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेने यावर्षी १० टक्के लाभांश सभासदाना घोषित केला असून सभासदाच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती अध्यक्ष कर्डीले यांनी यावेळी दिली.
या पुढेही संस्था कशी जास्त नफ्यात येऊन सातत्याने सभासदांना चागला लाभांश वाटता येऊ शकेल,यासाठी वसुली महत्वाची असल्याचे प्रतीक गोरे यांनी सूचना केली.
संस्थेस १४.५० लाख इतका विक्रमी नफा झाल्याने १०% लाभांश देण्याचा निर्णय घेतला गेल्याचे वसंत कर्डीले यांनी मनोदय व्यक्त केला.
यावेळी संस्थेसाठी सुरक्षा कंपाउंड,इमारत दुरुस्ती,आदी विषयी चर्चा होऊन सरपंच कपूरचंद कर्डीले,सेवानिवृत्त अभियंता बापूसाहेब गोरे,व सतरकर गुरुजी यानी चर्चेत भाग घेतला.
संस्थेचे अहवाल वाचन सचिव खाटीक पी.बी.व सह सचिव एस.एस.पाटेकर यांनी केले.यावेळी संचालक राजहंस मंडलिक,रेवनाथ पाटेकर,संभाजी जगताप, पोलीस पाटील संभाजी कर्डीले, संचालक योगेश कर्डीले, भागचंद कर्डीले, बाळासाहेब आदमाने,सागर जगताप, दादासाहेब कर्डीले, एकनाथ बर्वे, बाबासाहेब कर्डीले,सावता शिनगारे,आप्पासाहेब गोरे,माजी सरपंच सोपान कर्डीले, व गोपीचंद कर्डीले ,मंगल पाटेकर, बबन मंडलिक, शिवाजी सतरकर, बाळासाहेब तावरे, व गोरक्षनाथ लोणकर,यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.