महिलांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोनई–केवळ चूल, मुलं, सांभाळण्यात महिलांनी आपला वेळ न घालवता आपल्या तील कलागुणांना वाव द्यावा,असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नुकतीच शनिशिंगणापूर येथील महाराष्ट्र राज्याच्या महिला ग्राहक सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून देवस्थानचे माजी विश्वस्त शालिनीताई लांडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ना.विखे यांच्या हस्ते सौ.लांडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ.लांडे यांचे कार्य सर्वच क्षेत्रात असून सेवाभावी म्हणून काम करतात, एक सामाजिक आवड असल्याने त्यांचे कार्य पाहता,पुढील कार्यास शुभेच्छा देऊन महिला आघाडी च्या माध्यमातून कार्य करण्याचे सुतूवात ना.विखे यांनी यावेळी व्यक्त केले.