मनोज जरांगे यांच्या लढ्याला पाठिंब्यासाठी भातकुडगाव फाट्यावर रस्ता रोको

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार अकरा ते एक या वेळेत रस्ता रोको करण्याचा आदेश पाळत तब्बल दोन तास रस्ता रोको करून शासनाचा निषेध केला.
सग्या सोयऱ्यांच्या काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी साठी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे या सह इतर मागण्यांसाठी चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने शेवगाव तालुक्यातील भातकुडगावफाटा चौफुल्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लग्न तिथी असल्याने वऱ्हाडी मंडळीनां घेऊन जाणाऱ्या अनेक वाहने या रस्ता रोको मध्ये अडकल्याने सकल मराठा समाजाच्या तरुणांनी समजूतदारीची भूमिका घेऊन निषेध व्यक्त करत. रस्ता रोको आटोपता घेतला.यावेळी भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, जोरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे, तुकाराम शिंगटे, बाळासाहेब काळे, एकनाथ काळे, मच्छिंद्र आर्ले,राजेश लोंढे, भाऊराव फटांगरे, गणेश शिंदे, हरिचंद्र जाधव, संजय फाटके, राजु झिरपे,दिपक सामृत, कृष्णा जाधव, प्रशांत सामृत, महेंद्र खरड,पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह आदींनी रस्ता रोको साठी परिश्रम घेतले.यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्ता रोको वेळी शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मराठा समाजाचा अंत पाहू नये – राजेंद्र आढाव
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या सहा महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी सातत्याने अंतरवाली सराटी येथून मराठा समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडत आहेत. मात्र आता शासन वेळ काढून पणची भूमिका घेत असल्यामुळे मराठा समाजाचा संयम सुटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मराठा समाजाचा अंत पाहू नये. संगे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी सह इतर मागण्या मान्य कराव्यात. व मराठा समाजाला न्याय द्यावा.
अजय महाराजांची मस्ती उतरवणार – रामजी शिदोरे
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा वेळी अजय महाराज बावस्कर यांनी त्यांना पाणी घेण्याचा आग्रह करून त्यानंतर जरांगे पाटला विषयीच अपशब्द वापरल्याने मराठा समाज त्यांची मस्ती उतरवणारच अशा शब्दात मराठा आंदोलक रामजी रामजी शिदोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.