सोलापुरात जागतिक कन्या दिन साजरा…..

सोलापूर – सोलापूरातील पद्मशाली सखी संघमच्या वतीने जागतिक कन्या दिन शनिवारी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन महापौर श्रीकांचना यन्नम होत्या. दि. 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक कन्या दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या देशात मुलींसोबत होणा-या भेदभावाची जागरुकता नागरिकांमध्ये जागृती केली पाहिजे.
महापालिकेच्या तत्कालीन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, हा दिवस आपल्याला आपल्या मुलींना जपण्याची आठवण करुन दिले जाते. मुली आई-वडीलांच्या आयुष्यात पुष्कळ प्रेम आणि आनंद आणतात. त्यामुळे मुलींचा उत्सव साजरा केल्याने भविष्यात मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.
लहान मुलींच्या हस्ते केक कापून जागतिक कन्या दिन साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा माधवी अंदे, उपाध्यक्षा संध्याराणी अन्नम, सचिवा राधिका आडम,सहसचिवा जमुना इंदापूरे, कार्याध्यक्षा वैशाली व्यंकटगिरी, खजिनदार प्रभावती मद्दा यांच्यासह अनेक महिला आणि मुली उपस्थित होत्या.
.