आण्णा हजारेंच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी-शरद पवळे

मॉलमध्ये वाईन विक्री सुरु केल्यास राज्यभर निदर्शने करू-पवळे
पारनेर प्रतिनिधी
-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वराज पुस्तकात आण्णासाहेब हजारे यांची प्रस्तावना घेतलेली असताना पुस्तकामध्ये सरकारने दारुचे धोरण ठरवताना ग्रामसभेला,जनतेला विचारूनच ठरले पाहीजे, महिलांच्या परवानगिशिवाय परवाने देवु नये परंतु दिल्ली सरकारने दारू पिण्याच्या परवानगीचे २५ वरून २१ केले, प्रत्येक वार्डात दोन तिन दारुच्या दुकानांना परवानगी देत 6०% सरकारी दुकाने ४०% खासगी दुकाने असताना १००% खासगी दुकानांना परवानगी देण्यात आली असुन दिल्ली सरकारच्या बोलण्यात आणि कृतीतील फरक याबद्दल जनहितासाठी आण्णांनी आपले मत व्यक्त केले होते-पवळे
जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांनी आपले संपुर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले असुन आज वयाच्या ८५ नंतरही आण्णा हजारे समाजाहीतासाठी संघर्ष करत आहे हा समाजासमोर मोठा आदर्श आहे देशातील बलाढ्य शक्तींसमोर जनतेचा आवाज होवुन लढत आहेत त्यांच्या संघर्षाची प्रेरणा घेत अनेक युवा निस्वार्थ समाजसेवेचे व्रत घेवुन उभे राहताना दिसत आहेत आण्णांनी महराष्ट्रात दारूबंदीसाठी मोठे काम केले असुन महाविकास आघाडी सरकारने मॉलमध्ये वाईन विक्रिचा निर्णय घेतला होता आण्णांच्या विरोधानंतर तो मागे घेण्यात आला राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे,फडणवीस सरकारने मॉलमध्ये वाईन विक्रीचे संकेत दिले असुन याला आण्णा हजारेंनी विरोध दर्शवला असुन या पार्श्वभुमीवर दारूबंदी चळवळीचे शरद पवळे यांनी आण्णा हजारेंची राळेगणसिद्धी येथे भेट घेत दारुमुळे महामार्गावर घडणारे, दारुमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न,येणाऱ्या पुढच्या पिढीच भविष्य धोक्यात येईल, व्यसनाधिनतेमुळे शरीर कमजोर होवुन जगण्याची इच्छा संपते व्यसनाधिनता एक सामाजिक समस्या असुन राज्य सरकारचा निर्णय बेकायदेशीर असंवैधानिक आहे अशा विविध विषयांवर भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली
यावेळी पवळे यांनी पुढच्या पिढिच्या भविष्यासाठी भक्कमपणे चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आण्णांच्या पाठीमागे राहण्याचे अवाहन केले असुन राज्य सरकारने आण्णांच्या ईशार्याला गांभिर्याने द्यावे अन्यथा आम्ही लवकरच राज्यातील दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेवुन राज्यभर निदर्शने करणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे यांची वाईन विक्री शेतकरी हिताची हि भुमिका केविलवानी वाटते शेतकऱ्यांच्या बहुतांश शेतमालाची प्रोसेसिंग करून बाजारात विक्रि केली जाते याचा प्रत्यक्ष नफा शेतकर्यांना मिळत नाही त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत त्याचबरोबर पंजाबमधील तरुण ड्रग्सच्या आधिन झाला आहे पंजाब सरकार नशामुक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे ती वेळ महाराष्ट्रावर येवु देवु नका युवाही राष्ट्राची संपत्ती आहे तिला व्यसानाधिन करु नका असे दारूबंदी चळवळीचे शरद पवळे यांनी बोलनाता सांगितले.