पारनेर ग्रामीण पतसंस्थेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सभासदांना ११ टक्के लाभांश : काशिनाथ दाते सर!
पारनेर प्रतिनिधी
पारनेर ग्रामीण पतसंस्थेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार नुकतीच पारनेर येथील मनर्णिका लॉन्स येथे संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी व्हा. चेअरमन बाळासाहेब सोबले, संचालक रखमाजी कापसे सर, लक्ष्मण डेरे, सुरेश बोरुडे सर, अर्जुन गाजरे, राजेंद्र औटी, शिवाजी काळे, कृष्णा उमाप, सुभाष राठोड, सुनील गाडगे, सुनंदा दाते, शोभा तराळ तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात उपस्थितीत होते.
संस्थेला सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात २ कोटी १२ लाख ४४ हजार ५२४ निव्वळ नफा व ऑडिट वर्ग मिळाल्याचे चेअरमन काशिनाथ दाते सर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले. संस्थेकडे १९ वर्षाच्या कालावधीत मार्च २०२२ अखेर १६५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेले आहेत हे सभासदांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. संस्थेची बँक गुंतवणूक ६९ कोटी असून, स्थावर मालमत्ता ४ कोटी ४० लाख आहे. संस्थेमार्फत सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभासदांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व व्यवसायासाठी १३५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केलेले आहे. संस्थेचे अहमदनगर, पुणे, ठाणे व मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र असून संस्थेच्या पारनेर, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, बेलवंडी फाटा, जामगाव, नारायणगव्हाण, आळेफाटा, सुपा, कामोठे, अहमदनगर, वनकुटे, ढवळपुरी, भोसरी, खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी व शिरूर अशा १७ शाखा सुरू आहेत. संस्थेचे चेअरमन काशिनाथ दाते यांनी सांगितले संस्थेच्या पारनेर, टाकळी ढोकेश्वर, जामगाव,सुपा, कामोठे, खडकवाडी, आळेफाटा व शिरूर येथे स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेने पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, सुपा, बेलवंडी फाटा, जामगाव, ढवळपुरी येथे सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले व सभा खेळीमेळणे संपन्न झाली. सभेचे सत्र संचालन रखमाजी कापसे सर यांनी केले. यावेळी उद्योजक दिलीप दाते, चंदन मापारी, दिगंबर पुजारी, डॉ. जयसिंग दिवटे, ॶॅड. अनिल वाखारे , युवा नेते डॉ. प्रदिप दाते, पै. युवराज पठार,जयवंत डांगे, बबन दाते, विनायक लोंढे, विकास रोकडे, अमोल रोकडे, पारुनाथ ढोकळे सर, बापूसाहेब गुंजाळ, संजय भगत, पांडुरंग भालके, विनोद खैरे, रवींद्र आहेर, बापूराव शेळके, डॉ. सुदाम आहेर, गणेश गागरे, विष्णू खैरे, रोहिदास खैरे, शशिकांत खंदारे, जयश्री शिंदे,पै. संतोष गाढवे, पंढरीनाथ सांगळे, पोपट बांगर, बबन धुरपते, गणेश बर्वे, राजेंद्र कदम, ज्ञानदेव विरोळे, साहेबराव वाडेकर, अंबरनाथ वाळुंज, अनुप पोळ, अजित मोढवे, अशोक जाधव, भागचंद मोढवे, मेजर सतीश गाडीलकर, केरू सोबले, दिनकर सोबले, बाबाजी बांगर, उत्तम खैरे, रोहिदास खैरे, भाऊसाहेब टेकुडे, पोपट दरेकर, संतोष टेकुडे, संपत गागरे, रंगनाथ शिंदे, कारभारी पवार, लक्ष्मण शिंदे, सिताराम केदार, भाऊसाहेब गाजरे, श्रीरंग गाजरे, संपतराव गागरे, देवराम जाधव, उत्तम गागरे, तुकाराम बागुल, सखाराम बागुल, संजय काशीद, भिमाजी मुसळे, विकास गागरे, संजय शेवंते, भास्कर शिंदे, रामदास गागरे, संपत आहेर, बबन पवार, सखाराम नवले, नारायण फटांगरे, लखन जाधव, ज्ञानदेव रोकडे, राजू शिंदे, बाबासाहेब हुलवळे, बाबासाहेब नवले, अर्जुन पिंगळे, पांडुरंग कारंडे, संतोष मोरे, पांडुरंग हांडे, बाळासाहेब कारंडे, बाळासाहेब राक्षे, जालिंदर शेळके, रंगनाथ दाते, बापूसाहेब शिंदे, भागाची कदम, सुभाष वाळुंज, साहेबराव कापसे, कैलास कवडे, कैलास कापसे, देवराम गोरडे, सुदाम कापसे, बबनराव थोरात, शिवाजी रोकडे ,मोहन परांडे, अर्जुन लंके, ज्ञानदेव दाते, राजेंद्र रोकडे, नाथु बांगर, अर्चना गागरे ,सीमा रोकडे, कविता ढोकळे, ताई कुटे, प्रवीण साळवे, किशोर शहाणे इत्यादी सभासद व संस्थेचे कर्मचारी होते यावेळी शिवछत्रपती क्रीडा संकुल पारनेर चा पैलवान साहिल बंगाल याची १७ वर्षाखालील नॅशनल कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल, पैलवान ऋषिकेश लांडे यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे ८६ किलो वजन गटात दुसरा क्रमांक मिळवला तसेच उप महाराष्ट्र केसरी योगेश पवार यांचा सत्कार करण्यात आला.