इतर

माजी मंत्री शंकरराव गडाखांचा हा फोटो होतोय व्हायरल!

विजय खंडागळे –

सोनई प्रतिनिधी

राज्याचे माजी मृद व जलसंधारण मंत्री आ.शंकरराव गडाख यांचा एक फोटो सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.हा फोटो आहे शंकरराव गडाख हे एका निवांत ठिकाणी सध्या पोशाखात जमिनीवर बसून वनभोजना करतानाचा.

आ.शंकरराव गडाख हे स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदार संघात २०१४ च्या पराभवा नंतर २०१९ च्या निवडणूकित विजयी झाले गेले. पराभवानंतर गडाख यांनी स्वतः मध्ये मोठा बदल घडवून आणला.२०१४ ते २०१९ प्रचंड जनसंपर्क वाढवून पुन्हा २०१९ च्या निवडणूकित विजय मिळवून विधानसभेत गेले, नुसते विधानसभेतच गेले नाही तर शिवसेनेला पाठिंबा देऊन महाविकास आघाडी सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री ही झाले. परंतु मंत्री झाले तरीही त्यांच्या साधेपणाला व जनसंपर्क यात बाधा येऊ दिली नाही. सातत्याने मतदार संघात दौरे करून जनतेचे प्रश्न सोडविन्यावर भर दिला.
राज्यात आणि मतदार संघात दौरा करत असताना मंत्रीपणा बडेजाव न आणता घोंगडीवर बसणे, टपरीवर चहा पिणे असे त्यांचे अनेक फोटो यापूर्वी व्हायरल झालेले आहेत.त्याच बरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री असतांना सुद्धा धाब्यावरील बाजेवर बसून घरचा डबा खातानाचे फोटो ही व्हायरल झाले होते.
मात्र या सर्व व्हायरल फोटो पेक्षाही एक जरा हटके फोटो सध्या फेसबुक, व्हाट्सएप,ट्विटर, इन्स्टाग्राम वर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोत पायजमा-शर्ट परिधान केलेले गडाख हे रद्दी वर्तमानपत्र जमिनीवर टाकून त्यावर बसलेले असून एका छोट्याशा स्टीलच्या डब्यातील भाजी भाकरी खात आहेत.शेजारी ऊसाचे पीक आणि पाठीमागे वनीकरणाचा भाग दिसत आहे.हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.अधिक माहिती घेतली असता हा फोटो २०१८-१९ मधील असल्याचे समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button